amol mitkari News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्याने पोटशूळ; संतोष देशमुख प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली

Amol Mitkari News : संतोष देशमुख प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्याने पोटशूळ उठलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांच्यावर गंभीर केले जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरेश धस यांच्या आरोपानंतर अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला आहे.

सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख प्रकरणात काही गौप्यस्फोट केले आहेत. 'मी या प्रकरणात नाव घेणार नाही. आकाच्या आदेशाशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर असून तोच आदेश देत होता. त्यांना क्रुरतेने मारतोय हा प्रकार व्हिडिओ कॉल करून दाखवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. सुरेश धस यांच्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले,'गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते करत असल्याचे दिसून येत आहे. अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडले, ते सुरेश धस हे आज महायुतीचे आमदार आहेत. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. पण दोन्ही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं. त्यांना दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्याने पोटशूळ सुरु झाला आहे'.

'आमचं म्हणणं आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येचं कोणी समर्थन करू शकत नाही. जो कोणी दोषी असेल, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. ही भूमिका सुरुवातीपासून मांडली. अशीच भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली. पण आता या प्रकरणात सुरेश धस राजकारण करतात, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. ते महायुतीचे घटक आहेत. संदिप क्षीरसागर यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही. त्यांच्या वडिलांना कसा आदर करतात, हे दुसऱ्यांबद्दल कसं वागू शकतात. सगळ्यांनी एकत्र दुसरं राजकारण केलं आहे का? हे सुद्धा तपासलं पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT