Maharashtra Politics : जयंत पाटलांमध्ये धमक आहे का? सरकारविरोधात लढायची - गोपीचंद पडळकर

gopichand padalkar criticize Jayant Patil : महाविकास आघाडीतील कोणाच्यात आता सरकार विरोधात लढायची हिंमत नाही, दम राहिला नाही, जयंत पाटलांच्यात पण हिंमत नाही, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये लगावला.
गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकरSaam Tv
Published On

gopichand padalkar criticize Jayant Patil :हाविकास आघाडीतील कोणात्याच नेत्यामध्ये आता महायुती सरकार विरोधात लढायची हिंमत नाही, असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत, त्यांच्यात हिंमत आहे का ? सरकार विरोधात लढायची ? असा सवाल करत लढणं हे रक्तात असावे लागते, हे लोक लगेच वळचणीला पळतात, त्यामुळे हे लढूचं शकत नाही, अशी टीका देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आता आपण चिंता करायची नाही, वळचणीला कोण जात असतात, साप, उंदीर. पण वाघ कोणाच्या वळचणीला जात नाही, असा टोला देखील पडळकरांनी लगावला. ते सांगलीच्या आटपाडी येथे आयोजित सत्कार सोहळ्यादरम्यान बोलत होते.

अडीच वर्ष जयंत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री होते, पण जिल्हा नियोजन बैठकीला येण्याआधी, मी येणार आहे का नाही, हे माझ्या आमदार मित्राला फोन करून विचारायचे, असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तर कोणाला यायचं ते येऊ दे, जयंत पाटील येणार आहेत, म्हणतात येऊ द्या आपल्याला काय करायचे आहे. पालकमंत्री होणार आहेत म्हणतात, मग काय घर काढणार का ? त्यामुळे आपण कोणा येतंय, याचा विचार करायचा नाही,आपले पण दिवस येतात,ते आलेत,हे एन्जॉय करा,असं मत यावेळी आमदार पडळकर यांनी व्यक्त केले.

गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar: ...तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल, गोपीचंद पडळकर बरळले!

महाराष्ट्र पुरोगामी हे थोतांड,हे तर प्रचंड जातीयवादी राज्य - गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र पुरोगामी राज्य हे थोतांड आहे, पुरोगामी राज्य हे फक्त भाषणा पुरते असून हे राज्य प्रचंड जातीयवादी आहे, असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेय. महाराष्ट्र फुले-शाहू - आंबेडकरांच्या विचारांवर चालतं, फक्त भाषणापुरते असून हे राज्य जातीयवादी आहे, हे डोक्यात फिट करून घ्या, हे आपण बदलू शकत नाही. पण आता जाती-जातीतील भिंती तोडून काम करावे लागेल. गावा-गावात एकत्र यावे लागेल आणि वैचारिकपणे काम करावे लागेल,असे मत देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.

गोपीचंद पडळकर
Nitesh Rane News: '...तर मी आणि गोपीचंद पडळकर जेलमध्ये असू', नितेश राणेंचे सर्वात मोठे विधान; नेमकं काय म्हणाले?

राज्यातले सगळे मस्तवाल आता वळचणीला आलेत

राज्यातले सगळे मस्तवाल आता वळचणीला आले आहेत, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. अधिवेशन झालं, पण कोणी विरोधक मोठ्याने बोलायला तयार नाही, त्यामुळे ते तिकडे आहेत की, आमच्याकडे आहेत, हे कळेना. काँग्रेसवाले तर प्रश्न पण उपस्थित करतात आणि उत्तर पण तेच देतात, त्यामुळे ते सगळे हवालदिल झाले आहेत, काहीच दम नाही,असा टोला पडळकर यांनी लगावला.

गोपीचंद पडळकर
Ajit Pawar: अजित पवारांनी जयंत पाटील यांना डिवचलं; विधीमंडळात पवार- जयंत पाटलांची टोलेबाजी

विरोधक पण स्ट्राँग पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही, पुढे कोणाचं स्ट्रॉंग दिसत नाही. आणि एखादा मस्तवाल असला तर त्याच्या विरोधात लढायला मजा येते, पण सगळे मस्तवाल आता वळचणीला आले आहेत, असे विधान आमदार पडळकरांनी केले आहे. आपला नेता मुख्यमंत्री झाला यामध्ये आपण खूश आहे, यापेक्षा सगळी येऊन देवा भाऊंच्या पाया पडतात, यामध्ये आपण जास्त खूश आहे, असे विधान देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com