रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २३ सप्टेंबर
Gopichand Padalkar Controversy: राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच धनगर बांधवही आक्रमक झाला आहे. आज राज्यभर धनगर बांधवांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनादरम्यान बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. धनगरांनी बकरी राखायचे बंद केले तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचे मटण खायला लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत. पडळकर यांच्या या विधानावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने वातावरण तापलेले असतानाच आता धनगर बांधवही आक्रमक झाले आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुणे बेंगलोर महामार्गावरी कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
या आंदोलनादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनगर आरक्षणाची बाजू मांडताना गोपीचंद पडळकर यांनी एक धक्कादायक विधान केले. धनगरांनी बकरी राखायचे बंद केले तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचे मटण खायला लागेल, असं ते म्हणाले. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमधील वाचाळविरांनी पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे, अशातच आता पडळकरांनी केलेल्या या विधानाने नवा वादंग उभा राहण्याची शक्यता आहे.
धनगर समाज आरक्षण मागणीसाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पंढरपुरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाने आज राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पंढरपूर - कराड मार्गावर धनगर बांधवानी शेळ्या मेंढ्या घेऊन रास्तारोको आंदोलन केले. सरकारने धनगड दाखले रद्द करून तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी हा रास्तारोको करण्यात आला.
पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर समाजाला लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी बारामती इंदापूर रस्त्यावर धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने काटेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेय. या रास्ता रोको मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच अकोला जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरहीळ धनगर समाजाचा रास्ता रोको सुरू आहे.. या आंदोलनात धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. धनगर समाजाच्या रास्ता रोको मुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.