Maharashtra Politics: छगन भुजबळ दादांची साथ सोडणार? भाजपसोबत जाणार? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची 'इनसाईड स्टोरी'

Chhagan Bhujbal Meet CM: राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिपदाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. भुजबळांची फडणवीसांशी तब्बल ४० मिनिटं चर्चा झाली.
Chhagan Bhujbal Meet CM
Maharashtra Politics Google
Published On

मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांनी अजितदादांना टाळून सागरचा मार्ग धरला. त्यामुळे भुजबळ भाजपात जाणार की काय अशी चर्चा आता रंगू लागलीय. कारण सागरवर भुजबळांची फडणवीसांशी तब्बल ४० मिनिटं चर्चा झाली. पाहूयात या बैठकीची इनसाईड स्टोरी.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेतल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी अजितदादांना न भेटताच थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा सागर बंगला गाठला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्य़ा. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली.

Chhagan Bhujbal Meet CM
Ajit Pawar: आमच्या पद्धतीने प्रश्न सोडवू; छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

भुजबळांच्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा यामुळे रंगू लागलीय. विशेष म्हणजे पुढच्या आठ-दिवसात फडणवीस तोडगा काढणार असल्याचा दावा भुजबळांनी केलाय. तर पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचं भुजबळांनी बोलून दाखवलंय. तर भुजबळांसारखा नेता हवा असल्याचं सांगत फडणवीसांनी सूचक विधान केलंय.

Chhagan Bhujbal Meet CM
Manikrao Kokate : भुजबळांना घरचा आहेर; त्यांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याची खरमरीत टीका

महायुतीच्या महाविजयात ओबीसींचा वाटा मोठा असल्याचं भुजबळ म्हणालेत. तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी मात्र त्यांनी ओबीसी मतांवर टोला लगावालय. तर ही पक्षांतर्गत बाब म्हणत अजित पवारांनी भुजबळांच्या नाराजीला विशेष महत्त्व न दिल्याचं दिसतंय. भाजप नेत्यांनी भुजबळांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते. आता भुजबळ भाजपात आल्यास भाजपचे कार्यकर्ते दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर महायुतीचाच घटक असलेल्य़ा राष्ट्रवादीतून भुजबळ भाजपात गेल्यास अंतर्गत नाराजी तर पसरणार नाही ना हेही भाजपला पाहावं लागणार आहे. त्यामुळे नाराज भुजबळ दादांविरोधात बंड करून भाजपात जाणार की आणखी दुसरा कोणता मार्ग स्वीकारणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com