Ambernath MNS Warning News: अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले १५ दिवसात हटवा, अन्यथा १६ वा दिवस आमचा असेल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांबाबत मनसेने आज अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर अविनाश जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत हा इशारा दिला. (Breaking Marathi News)
अंबरनाथ शहरातील अनधिकृत बांधकामं, फेरीवाले, नालेसफाई आणि इतर नागरी समस्यांबाबत मनसेनं अंबरनाथ नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यानंतर अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकेत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
या भेटीत अंबरनाथ पालिकेत वारंवार होणाऱ्या अँटी करप्शन विभागाच्या कारवायांमुळे पालिकेची प्रतिमा खराब होत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अविनाश जाधव यांनी केली. तसंच शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी फक्त नोटिसा बजावल्या जातात, त्याचं पुढे काय होतं? असा सवालही त्यांनी केला. (Latest Marathi News)
यावेळी एमआरटीपी कायद्यांतर्गत अनधिकृत बांधकामांना बजावलेल्या नोटीसेसचा गठ्ठाच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला. तर अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंना बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवरूनही अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. फेरीवाले हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत देतो, मात्र १६ वा दिवस आमचा असेल, असं म्हणत '१ तासात फेरीवाले साफ करून दाखवले नाही, तर पद सोडेन!', असं चॅलेंजच त्यांनी मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना दिलं.
तसंच तुम्ही आमच्या अंबरनाथच्या कार्यकर्त्यांना अटक कराल, मात्र मी बदलापूर, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण इथून कार्यकर्ते आणेन आणि फेरीवाले हटवून दाखवेन, असंही अविनाश जाधव म्हणाले. आता त्यांच्या या इशाऱ्यानंतर तरी अंबरनाथमधील अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाले या प्रश्नांकडे नगरपालिका गांभीर्याने लक्ष देते का? हे पाहावं लागेल.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.