Nanded Crime News: नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती? प्रेमीयुगुलाचे मृतदेह नदीकाठी आढळले; परिसरात खळबळ

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह गोदावरी नदी काठावर आढळून आला.
Nanded Crime News Girlfriend and boyfriend death mukhed taluka mugat village
Nanded Crime News Girlfriend and boyfriend death mukhed taluka mugat villageSaam TV

संजय सूर्यवंशी साम टीव्ही

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह गोदावरी नदी काठावर आढळून आला. मुगट गावातील नदीकाठी प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विकास धोंडिबा तुपेकर (वय २२ वर्ष) आणि ऋतुजा बालाजी गजले (वय १८ वर्ष) असं मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.  (Breaking Marathi News)

Nanded Crime News Girlfriend and boyfriend death mukhed taluka mugat village
Ahmednagar Accident News: नगर-जामखेड रोडवर भयानक अपघात; मद्यधुंद पिकअप चालकाने ५ जणांना उडवलं

प्राथामिक माहितीनुसार, या दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना (Police) देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रेमीयुगुलाची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, मयत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोन्ही युवक युवती मुगट गावातीलच (Nanded News) रहिवाशी आहेत. दोघांचे घर एकमेकांसमोर आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाची कुणकुण कुटुंबीयांना लागली होती. याच विषयावरून अनेकवेळा वाद होऊन विकासला मारहाण देखील करण्यात आली होती.

Nanded Crime News Girlfriend and boyfriend death mukhed taluka mugat village
Sangli Crime News: भयंकर! नवऱ्याचा खून करून बायको फरार; पोलीस तपासांत धक्कादायक कारण उघड

मात्र, तरी ही दोघांमधील प्रेमसंबंध सुरूच होते. पाच दिवसांपूर्वी हे प्रेमीयुगुल अचानक बेपत्ता झाले होते . कुठे गेले याची कोणालाच माहिती नव्हती. गावात उलट सुलट चर्चा देखील सुरु झाली होती. अखेर २३ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह (Crime News) गावातील गोदावरी नदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

या दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या घटनेनंतर हत्या की आत्महत्या या बाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. हत्या झाल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com