UP Maid Viral News: आधी बादलीत केली लघुशंका, नंतर त्याच पाण्यानं घर पुसलं; मोलकरणीच्या किळसवाण्या कृत्याचा VIDEO व्हायरल

Woman Shocking act Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मोलकरीण घर साफ करताना बकेटमध्ये लघुशंका करताना दिसून येत आहे.
Woman Shocking act Viral Video
Woman Shocking act Viral VideoSaam TV

Woman Shocking act Viral Video: आपलं घर नेहमी साफ आणि स्वच्छ राहावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी घरातील साफ सफाईच्या कामासाठी अनेकजण एखाद्या महिला मोलकरीणीला नोकरीवर ठेवतात. उच्चभ्रू वस्तीमध्ये मोलकरणीची गरज जास्त असते.

मात्र, याच मोलकरीण काय करतील याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मोलकरीण घर साफ करताना बकेटमध्ये लघुशंका करताना दिसून येत आहे.  (Breaking Marathi News)

Woman Shocking act Viral Video
Nanded Crime News: नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती? प्रेमीयुगुलाचे मृतदेह नदीकाठी आढळले; परिसरात खळबळ

किळवसवाणी बाब म्हणजे बकेटमध्ये लघुशंका केल्यानंतर ही मोलकरीण याच पाण्याने घर साफ करताना दिसून येत आहे. हा किळवसवाणा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर घरमालकाने तातडीने पोलिसांत (Police) तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलं आहे.

उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) ग्रेटर नोयडा शहरात हा प्रकार घडला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा वेस्टच्या अजनारा होम्स सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी एका मोलकरणीला कामावर ठेवलं होते.

Woman Shocking act Viral Video
Ahmednagar Accident News: नगर-जामखेड रोडवर भयानक अपघात; मद्यधुंद पिकअप चालकाने ५ जणांना उडवलं

या व्यक्तीने घरात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवलेले होते. दरम्यान, एकेदिवशी सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना या व्यक्तीला महिला बकेटवर बसलेली दिसली. त्याने व्हिडीओ (Viral Video) व्यवस्थित तपासला असता, महिला बकेटमध्ये लघुशंका करताना दिसून आली.

संतापजनक बाब म्हणजे, बकेटमध्ये लघुशंका केल्यानंतर या महिलेने त्याच पाण्याने घर साफ केले. या किळवसवाण्या प्रकारानंतर घरमालकाने तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्याच्या आधारे महिलेला ताब्यात घेतलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com