Ambarnath Accident Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Accident : कल्याण बदलापूर मार्गावर अपघात; वळण घेताना दोन दुचाकींचा धडक, दोघांची प्रकृती गंभीर

Ambarnath News : रस्त्याकडे वळत असताना त्यांच्या मागून येत असलेल्या दुचाकीवरील मेहफुज शहा आणि निलेश विश्वकर्मा यांची त्यांना जोरदार धडक बसली.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कल्याण बदलापूर मार्गावर दोन दुचाकींचा अपघात झाला आहे. एएमपी गेटकडे वळण घेत असताना दुचाकींची धडक झाली असून २ दुचाकींच्या अपघातात ४ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

अंबरनाथच्या कानसई एमपी गेट परिसरात राहणारे दादाभाऊ हटकर हे त्यांचा मुलगा राज हटकर याच्यासोबत पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून घराकडे निघाले होते. दरम्यान एमपी गेटच्या रस्त्याकडे वळत असताना त्यांच्या मागून येत असलेल्या दुचाकीवरील मेहफुज शहा आणि निलेश विश्वकर्मा यांची त्यांना जोरदार धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही मोटारसायकल वरील चौघेजण खाली फेकले गेले. 

पेट्रोल भरून घरी परतत असलेले दादाभाऊ हटकर यांनी उजवीकडे वळताना कोणताही सिग्नल न देता अचानक वळण घेतले. यामुळे हा अपघात झाल्याचा दावा दुसऱ्या दुचाकीवरील मेहफूज शहा यांनी केला आहे. तर हटकर यांनी हा अपघात कसा झाला हे समजलंच नाही, असं सांगितलं आहे.

दोघांची प्रकृती गंभीर 

दरम्यान या अपघातात चौघेही जखमी झाले. यापैकी निलेश विश्वकर्मा आणि राज हटकर हे दोघे गंभीर जखमी झाले. या सर्वांना आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर राज हटकर आणि निलेश विश्वकर्मा या दोघांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali Politics: शिवसेना-भाजप राडा प्रकरणात मोठी कारवाई, शिंदेसेनेच्या जखमी उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: मतदानाआधी लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे ₹१५०० जमा, आता जानेवारीचा हप्ता कधी येणार?

Maharashtra Live News Update: पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण, मुंब्रातून एकाला अटक

Valentine Day Love Story: प्रेमपत्र! नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं

Quick easy tilgul recipe: मकर संक्रांतीसाठी घरीच बनवा झटपट तीळगूळ, वाचा सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT