Badlapur News : अतिसारामुळे चिमुकलीचा मृत्यू; एकाच घरातल्या ६ मुलांना झाला त्रास

Ulhasnagar News : बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आदिवासी वाडीत असलेल्या गौऱ्या मिरकुटे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरातील ६ मुलांना २ दिवसांपूर्वी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
Badlapur News
Badlapur NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : बदलापुरात अतिसारामुळे एकाच घरातील सहा मुलांना त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात एका अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने मुलांना अतिसाराची लागण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आदिवासी वाडीत असलेल्या गौऱ्या मिरकुटे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरातील ६ मुलांना २ दिवसांपूर्वी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर सहाही मुलांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात त्यांच्या घरातील सपना मिरकुटे या अडीच वर्षाच्या मुलीला यात जास्त झाला आणि तिची प्रकृती आणखी बिघडली. 

Badlapur News
Cyber Crime : सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत दाखविली भीती; सायबर चोरट्यांनी ५७ लाखांचा गंडा

उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू 

त्यानंतर तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कुटुंबातील इतर ५ मुलांनाही उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

Badlapur News
Toranmal News : तोरणमाळची बस सेवा दोन महिन्यापासून बंद; मिनी बसेस खराब झाल्याने पर्यटनासाठी येणाऱ्यांची अडचण

शहरात अनेकांना त्रास 

सध्या बदलापूर शहरात अनेकांना अतिसाराची साथ सुरू झाली असून अनेक लहान मुलांना जुलाब उलट्या असे त्रास होत आहे. हा आजार दूषित पाण्यातून होत असल्यामुळे बदलापूरच्या चिमुकलीचाही मृत्यू दूषित पाण्यामुळेच झाला असण्याची शक्यता आहे. यामुळे पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com