Toranmal News : तोरणमाळची बस सेवा दोन महिन्यापासून बंद; मिनी बसेस खराब झाल्याने पर्यटनासाठी येणाऱ्यांची अडचण

Nandurbar news : नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. जिल्ह्यातील हे एक उत्तम असे पर्यटन स्थळ आहे. अर्थात याठिकाणी पर्यटनासाठी एक चांगली सुविधा असून राज्यभरातून तेथे पर्यटक येत असतात.
Toranmal News
Toranmal NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळची ओळख आहे. तोरणमाळ या ठिकाणी देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून बस सेवा नसल्याने येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. जिल्ह्यातील हे एक उत्तम असे पर्यटन स्थळ आहे. अर्थात याठिकाणी पर्यटनासाठी एक चांगली सुविधा असून राज्यभरातून तेथे पर्यटक येत असतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने या दिवसात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पर्यटकांना येण्याजाण्यासाठी या ठिकाणी मिनी बसची उत्तम अशी सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र याच बस बंद असल्याने समस्या निर्माण झाली आहे. 

Toranmal News
Bhandara News : 'लकी ड्रॉ'च्या नावाखाली शेकडोंची फसवणूक; ग्राहक व अभिकर्त्यांकडून फौजदारी गुन्ह्याची मागणी

तोरणमाळला येण्यासाठी दोन महिन्यापासून बस सेवा नसल्याने येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शहादा आगाराला तोरणमाळ साठी दिलेल्या मिनी बसेस स्क्रॅप झाल्याने या ठिकाणची बस सेवा बंद असल्याची माहिती शहादा बस आगाराच्या वतीने देण्यात आली आहे. मोठ्या बस येथे जात नसल्याने बस सेवा पूर्णपणे बंद आहे. 

Toranmal News
Cyber Crime : सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत दाखविली भीती; सायबर चोरट्यांनी ५७ लाखांचा गंडा

अर्थात आता येथे येणाऱ्या पर्यटकांना बस सेवा नसल्याने खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पर्यटकांना जास्तीचे भाडे द्यावे लागत आहे. दुसरीकडे बस सेवा कधी सुरू होईल? असा प्रश्न पर्यटक विचारताना दिसत आहेत. नवीन बसेस साठी पत्रव्यवहार केल्याची माहिती शहादा आगार प्रमुख भोई यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com