
शुभम देशमुख
भंडारा : साकोली येथील शुभमहालक्ष्मी इंटरप्राईजेसच्या संचालकांनी अभिकर्ते नियुक्त करून कुपनवर वस्तू देण्याची 'लकी ड्रॉ' योजना राबविली होती. दरम्यान संबंधितांनी अभिकर्ते व ग्राहकांची दिशाभूल आणि फसवणूक करत शेकडोंनी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
भंडाऱ्याच्या साकोली येथील शुभमहालक्ष्मी इंटरप्राईजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर, जनरल मॅनेजर व मॅनेजर आणि तेथे काम करणाऱ्यांचा सुद्धा या फसवणुकीमध्ये सहभाग असल्याचे म्हटले आहे. संबंधितांनी ग्राहकांना सुमारे १ हजार ४० कोटी रुपयांचा टुरिझमचा प्रोजेक्ट असल्याचे सांगून नागरिकांना मोठ्या प्रमाणात भूलथापा दिल्या आहेत. संस्थेने ठराविक रकमेवर लकी ड्रॉ काढून वस्तू देण्याची योजना राबविली होती.
मात्र ९ महिने लोटूनही इनामी 'ड्रॉ' न काढता वस्तू वाटप केले नाही. संचालकांनी ड्रॉ च्या साहित्याचे वाटप न करता रक्कमेचा अपहार करून अभिकर्ते व ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीला घेऊन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे.
बेमुदत उपोषण
याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. परंतु, कारवाई न झाल्याने काही अभिकर्ते व ग्राहकांनी बुधवारीपासून (४ डिसेंबर) त्रिमूर्ती चौकात बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. चौकशी व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.