Akola News  Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : धक्कादायक! मोटर पंप पाहण्यासाठी शेतात गेलेला शेतकरी घरी परतलाच नाही

ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सस्ती शेत शिवारात घडली.

अॅड. जयेश गावंडे

Akola News : पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याचा विहिरीतील लोखंडी पायऱ्या वरुन घसरून विहीरीत पडल्याने मृत्यु झालाय. ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सस्ती शेत शिवारात घडली.

शेख लुकमान शेख दिलावर असे या घटनेतील मृतक शेतकऱ्याचे नाव आहेय. शेतातील विहिरीत सोडलेली बोअर मशीन अचानक बंद पडली, दरम्यान मशीन बंद पडल्याने शेतकरी विहिरीत खाली उतरला अन् दुःखद घटना घडली.

अकोला (Akola) जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यातील सस्ती गावात शेख लुकमान शेख दिलावर यांचं कुटुंब वास्तव्यात आहे. दरम्यान त्यांच्याकडे चार एकर शेती असून गेल्या दोन-तीन दिवसापासून शेतात (Farm) कांदा लागवड सुरू आहे. आजही शेख लुकमान हे त्यांच्या दोघे भावासोबत शेतात कांदा लागवड साठी गेले होते, आणि काल आणि परवा लागवड केलेल्या कांदा पिकाला पाणी देण्यासाठी बोअर मशीन सुरू केली.

मात्र बोअर मशीन सुरू झाली नाही. ही बोअर मशीन शेतातील विहिरीत सोडलेली आहे, अचानक मशीन बंद पडल्याने शेख लुकमान हे विहिरीत लोखंडी पायऱ्याने खाली उतरले. मशीनची पाहणी केली, परत लोखंडी पायऱ्यांने वरते येत असताना अचानक या शेतकऱ्याचा तोल गेला, आणि तो पाण्यात पडला. या घटनेत शेख लुकमान या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. दरम्यान या शेतकऱ्याला पाण्यात पोहणे येत नसल्यामुळे या शेतकऱ्याला आपला जीव गमावावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT