मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

thalapathy vijay : मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. पाठिंबा देणारा मित्रपक्ष नाराज झाला आहे.
thalapathy vijay news
thalapathy vijaySaam tv
Published On
Summary

टीव्हीके पक्षाला पाठिंबा देणारा व्हीसीके पक्ष नाराज

व्हीसीके पक्षाच्या प्रमुखाने दर्शवली नाराजी

मागील डीएमके सरकार केलेल्या टीकेवरून दिलं प्रत्युत्तर

तमिळनाडूत रविवारी नवीन सरकारची स्थापना झाली. टीव्हीके प्रमुख विजय यांनी काल मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर थलपती विजय यांचा आज सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयात पहिला दिवस होता. कामाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री विजय यांच्या कारभारावर मित्रपक्ष नाराज झाला. मित्रपक्षाने 'वंदे मातरम' आणि 'तमिल थाई वलथु' गीतावरून नाराजी व्यक्त केली. शपथविधीवेळी 'वंदे मातरम' गीत हे 'तमिल थाई वलथु' या राज्य गीताआधी वाजवल्याने व्हीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी तमिळनाडूच्या परंपरेचं उल्लंघन केल्याचं म्हटलं.

व्हीसीके प्रमुख थिरुमावलवन यांनी विजय यांच्या शपथविधीवेळी सुरुवातीला 'वंदे मातरम' गीत आधी वाजवण्यावरून प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, 'तमिळ थाई वलथु' राज्यगीत आधी वाजवण्याची तमिळनाडूच्या सरकारी कार्यक्रमाची परंपरा आहे. परंतु विजय यांच्या शपथविधी वेळी उलट क्रम पाहायला मिळाला. आधी 'वंदे मातरम' गीत, नंतर राष्ट्रगीत, शेवटी 'तमिळ थाई वलथु' गीत वाजवण्यात आलं. या सर्व गोष्टी राज्यपालांच्या बोलण्यावरून झाल्या की, त्यांना खूश करण्यासाठी झाल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

thalapathy vijay news
Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

व्हीसीके पक्षाचे प्रमुख थिरुमावलन यांनी टीव्हीके पक्षाच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उत्तर मागितलं. शपथविधीत वंदे मातरम गीत वाजवण्यावरून राजकीय चिंता व्यक्त केली. शपथविधीत आधी 'वंदे मातरम' वाजवण्यावरून समर्थकांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे. आता यापुढे 'वंदे मातरम' गीताला प्राधान्य मिळेल की तमिळ राज्य गीत 'तमिळ थाई वलथु'ला सन्मान मिळेल, असा प्रश्न व्हीसीके पक्षाचे प्रमुख थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्री विजय यांना प्रश्न केला.

thalapathy vijay news
तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

तत्पूर्वी, मुख्यमंत्री विजय यांनी मागील सरकारवर टीका केली. तमिळनाडूवर १० लाख कोटींचं कर्ज आहे. राज्याची तिजोरी रिकामी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. थिरुमावलवन यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, 'फक्त कर्जाचा आकडा दाखवून लोकांना घाबरवले जात आहे. कर्जाचे मुल्यांकन हे राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत केले जाते. तमिळनाडूवरील कर्ज अजूनही १५ व्या वित्त आयोगाने ठरवलेल्या मर्यादेत आहेत. केवळ आकडे सांगून भीती निर्माण करण्याची राजकीय चाल असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com