Delhi Mayor Election : दिल्लीत महापौर कुणाचा? आज होणार फैसला

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या एमसीडी निवडणुकीत भाजपला 250 सदस्यीय मंडळात 104 जागा मिळाल्या, तर आपला 134 आणि काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या.
Delhi Mayor Election
Delhi Mayor ElectionSaam Tv
Published On

Delhi Mayor Election Latest News : दिल्ली एमसीडी निवडणुकीनंतर आज (२४ जानेवारी २०२३) सभागृहाची दुसरी बैठक होणार आहे. गरसेवकांच्या शपथविधीनंतर महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. पहिली सभा 6 जानेवारीला झाली होती, मात्र त्यावेळी कोणता नगरसेवक आधी शपथ घेणार यावरून भाजप भाजप आणि आपमध्ये जोरदार वाद झाले होते. यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले होते.

Delhi Mayor Election
Pune Bangalore National Highway : पुणे बंगळूर महामार्गावर साता-यातील शुक्रवार पेठेतील एकाची डाेक्यात गाेळी घालून हत्या

आजच्या बैठकीबाबत भाजपने पीठासीन अधिकाऱ्यांना पत्र लिहून शपथविधीमध्ये खास लोकांनाच सामावून घेण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या एमसीडी निवडणुकीत भाजपला (BJP) 250 सदस्यीय मंडळात 104 जागा मिळाल्या, तर आपला 134 आणि काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या.

दिल्लीला (Delhi) आज नवीन महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर आज सभागृहाची दुसरी बैठक होणार आहे. ज्यामध्ये दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाने भाजपचा पराभव करत विजय मिळवला होता.

आपने (AAP) शैली ओबराय यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे तर उपमहापौर पदाची उमेदवारी मोहम्मद इकबाल यांना दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने रेखा गुप्ता यांना महापौर पदाचं उमेदवार घोषित केलं आहे. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

महापौर पदाच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या राज्यपालांनी सत्या शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे. 6 जानेवारीला सुरुवातीला सर्व नगरसेवकांना शपथ दिली जाणार होती. मात्र, पिठासीन अधिकारी सत्या शर्मा यांनी उपराज्यपाल नियुक्त 10 स्वीकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. याला आपने विरोध करत अगोदर जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना शपथ देण्याची मागणी केली. आणि सभागृहात मोठा गदारोळ झाला.

Delhi Mayor Election
Gun Firing In USA: अमेरिका पुन्हा हादरली! गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू

महापौर निवडणूकीत 274 सदस्य करणार मतदान

दिल्ली महापौर निवडणुकीत 250 लोकनिर्वाचित सदस्यांसह 7 लोकसभा खासदार, 3 राज्यसभा खासदार आणि उपराज्यपालांनी नामनिर्देशीत केलेल्या 14 आमदारांना मतदानाचा अधिकार आहे.

भाजपकडे प्रथमदर्शनी संख्याबळ नसताना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार दिल्याने निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. भाजप ऐन वेळी काही करू शकते. या भीतीने आप बहुमत असूनही जपून पावलं टाकत आहे.

6 सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपचे २ सदस्य सहज निवडून येतील. मात्र, भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने भाजप काही चमत्कार घडून आणेल का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com