Gun Firing In USA: अमेरिका पुन्हा हादरली! गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू

गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा एकदा हादरली.
Crime News
Crime Newssaam tv
Published On

Gun Firing In USA News Update : गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा एकदा हादरली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दोन दिवसांत गोळीबाराच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी हाफ मून बे भागात गोळीबाराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आयोवा राज्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर एक जण जखमी झाला. हाफ मून बे परिसरात घडलेल्या या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Crime News
Actor Sudheer Varma Death: साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा; अभिनेता सुधीर वर्माच्या आत्महत्येने खळबळ

आयोवा मध्ये काय झाले?

अमेरिकेतील (America) आयोवा राज्यातील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक शिक्षक जखमी झाला आहे. पोलिसांनी (Police) अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जखमी विद्यार्थ्यांचा मृत्यू

डेस मोइनेस आयोवा येथील एका शाळेत सोमवारी दुपारी गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

गोळीबारात 2 विद्यार्थी ठार झाले, तर 1 शिक्षक गंभीर जखमी झाला. डेस मोइनेस पोलिसांनी दोन्ही मृत्यूंना दुजोरा दिला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. तिसरी व्यक्ती ज्याला गोळ्या लागल्या आहेत, तो शाळेतील शिक्षक असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

Crime News
Nanded Crime : प्राॅपर्टीच्या वादातून ग्रामसेवकाचा नायब तहसीलदारावर जीवघेणा हल्ला; नांदेडमधील खळबळजनक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शिक्षकाची प्रकृतीही चिंताजनक आहे. गोळीबारानंतर काही वेळातच पोलिसांनी तिघांना संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत.

कॅलिफोर्नियामध्ये रविवारीही झाला होता गोळीबार

दरम्यान, दोन दिवसात ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी 22 जानेवारी रोजी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com