Nanded Crime : प्राॅपर्टीच्या वादातून ग्रामसेवकाचा नायब तहसीलदारावर जीवघेणा हल्ला; नांदेडमधील खळबळजनक घटना

नांदेडमध्ये भोकरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून ग्रामसेवक असलेल्या भावजीने महिला नायब तहसीलदार मेव्हणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
crime news
crime news saam tv
Published On

Nanded crime News : नांदेडमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेडमध्ये भोकरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून ग्रामसेवक असलेल्या भावजीने महिला नायब तहसीलदार मेव्हणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी भोकर शहरातील देशपांडे गल्लीत घटना घडली आहे. शेजाऱ्यांनी तातडीने हल्ला करणाऱ्या भावजीला पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. (Latest Marathi News)

crime news
Mumbai Crime News: मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा चामणार असं धारधार शस्त्राच्या हल्ल्यातून बचावलेल्या महिला नायब तहसीलदाराचं नाव आहे. तर बालाजी नारायण हाके असं हल्ला करणाऱ्या ग्रामसेवक भावजीचं नाव आहे.

रेखा चामणार या भोकर तहसीलात पुरवठा विभागात नायब तसहसीलदार पदावर कार्यकरत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामसेवक बालाजी नारायण हाके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

रेखा चामणार या नांदेड (Nanded) भोकर तहसीलमध्ये पुरवठा विभागात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. आज सकाळी आॅफीससाठी घरा बाहेर पडण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे नेहमी प्रमाणे रेखा चामणार या ऑफिससाठी निघाल्या.

त्यावेळी बालाजी हाके घरी आला. त्याने अचानक हातातील धारधार शस्त्रान चामणार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी हाकेला पकडले आणि पोलिसाच्या (Police) स्वाधीन केले. या प्रकरणी रेखा चामणार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Ratnagiri News : शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती शिक्षिका; वाटेतच मृत्यूने गाठलं, हृदयद्रावक घटना!

बीडमध्ये नायब तहसीलदार महिलेला जाळण्याचा प्रयत्न

बीडमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. बीडच्या केजमध्ये ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून त्या बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीच नायब तहसीलदार वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com