Manasvi Choudhary
संगीतक्षेत्रातील संजू राठोड हे नाव सर्वानाच माहित आहे. केवळ देशभरात नाही तर, जगभरात संजू राठोडचे चाहते आहेत.
गुलाबी साडी, नऊवारी साडी यासारंख्या संजू राठोडच्या अस्सल मराठमोळ्या गाण्यांनी सामान्यांपासून ते टॉपच्या सेलिब्रिटींना थिरकायला लावले.
पण तुम्हाला माहितीये का? संजू राठोड हा जे काही आहे त्यामागची कथा वेगळी आहे. त्यांचा संगीतमय प्रवास अत्यंत खडतर होता.
सोशल मीडियावर संजू राठोडने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्यांच्या प्रवासाविषयी सागिंतलं आहे.
संजूने त्याचे अनेक जुने फोटो पोस्ट केले आहेत. तसेच या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने, ट्रेनच्या प्रवासानेच मला यशाच्या स्टेशनपर्यंत पोहोचवले... तो प्रवास आठवला की डोळे भरून येतात,
पण चेहऱ्यावर एक समाधान असतो...जेव्हा पाय दुखायचे तेव्हा मन सांगायचं, 'आज चालून घे, उद्या तुला धावायचं आहे.' त्या संघर्षानेच आज मला ही गती दिली आहे, असं म्हटलं आहे.
पाऊस असो वा कडक ऊन, ध्येयापर्यंत पोहोचण्याची ओढ इतकी होती की कधी थकवा जाणवलाच नाही.माझा भूतकाळ आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे, कारण त्याच प्रवासाने मला सांगितलं की शून्याची किंमत काय असते...
माझ्या या प्रवासात सुरुवातीपासून साथ देणाऱ्या आणि माझ्या संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे...