akola News  Saam tv
महाराष्ट्र

अकोला देशात सर्वाधिक उष्ण, पारा थेट ४७ अंशावर, राज्यातील या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

akola news : अकोला देशात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे. अकोल्याचा पारा थेट ४७ अंशावर पोहोचलाय.

Vishal Gangurde

विदर्भात उष्णतेची लाट

अकोल्याची भारतात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद

हवामान विभागाने नागरिकांना दिला काळजी घेण्याचा सल्ला

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात थेट 46.9 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर या भागांना आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आलाय.तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून 45 अंशापार तापमान पोहोचलं आहे.नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मागील पाच वर्षातील एप्रिल महिन्यातील अकोल्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 46.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. यापूर्वी एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 47.7 इतकं अकोला येथेचं 2019 मध्ये नोंदले गेले होते. आता पुन्हा यंदा अकोल्याच्या तापमानाचा पारा एप्रिल महिन्यात 47 अंशाच्या जवळपास पोहोचला.

जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील मागील काही दिवसातल तापमान पाहूयात..

19 एप्रिल : 45 अंश सेल्सियस.

20 एप्रिल : 43.2 अंश सेल्सियस.

21 एप्रिल : 43.6 अंश सेल्सियस.

22 एप्रिल : 43.7 अंश सेल्सियस.

23 एप्रिल : 44.3 अंश सेल्सियस.

24 एप्रिल : 45 अंश सेल्सियस.

25 एप्रिल : 45.6 अंश सेल्सियस.

26 एप्रिल : 46.9 अंश सेल्सियस.

विदर्भातील तापमान कसं आहे?

अकोला - 46.9, अमरावती - 46.8, बुलढाणा - 43.5, भंडारा - 44.0, ब्रह्मपुरी - 44.2, चंद्रपूर - 45.0, गडचिरोली - 44.6, गोंदिया - 44.4, नागपूर - 45.4, वर्धा - 46.4, वाशिम - 44.6, यवतमाळ - 46.0

वर्ध्यातही तापमानाचा पारा वाढला

वर्धा जिल्ह्याच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. तापमानाचा पारा हा 46.4 अंशावर पोहचला आहे. तसेच आज सोमवारी तापमान आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान 46.4 अंशावर होते, हा तापमान तीस वर्षानंतर पुन्हा उच्चाक गाठलाय. 30 एप्रिल 1996 रोजी तापमान 46.4 अंशावर होते, हेच तापमान रविवारी पुन्हा नोंदविण्यात आले. वर्ध्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तापमान पुन्हा वाढणार आहे. वाढत्या तापमानामुाळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

अमरावती जिल्हा होरपळला

अमरावती जिल्ह्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमानांचे उच्चांक होत आहे. काल अमरावतीचे तापमान 46.8 नोंदवण्यात आल्याने वर्षातला सर्वात हॉट दिवस ठरलाय. तर राज्यात अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सुद्धा झाली आहे. तर हा उष्णतेचा पारा 47 अंश डिग्री सेल्सिअस वर जाईल, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

Wednesday Horoscope : वागण्याकडे लक्ष असूद्यात, 4 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान; वाचा आजचे राशीभविष्य

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT