मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Ghatkopar landslide latest news : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे मुसळधार पावसामुळे मध्यरात्री दरड कोसळून ३ ते ४ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ७ ते ८ जण अडकल्याची भीती आहे.
Ghatkopar landslide latest news
Ghatkopar landslide latest news
Published On

Mumbai Ghatkopar East landslide latest news, : राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घाटकोपर पूर्व येथील गौसिया चाळ परिसरात मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अचानक डोंगराची दरड कोसळली. या भीषण अपघातात ३ ते ४ घरे पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत २ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सात ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली तेव्हा परिसरातील नागरिक गाढ झोपेत होते. अचानक मोठा आवाज होऊन डोंगराचा भाग थेट खाली असलेल्या चाळीतील घरांवर कोसळला. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घाटकोपर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक प्रशासनाने धोकादायक भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Ghatkopar landslide latest news
Maharashtra Cabinet : मुद्रांक शुल्कात मोठी सूट, फडणवीस सरकारनं घेतले ८ धडक निर्णय, वाचा एका क्लिकवर

७ ते ८ नागरिक अडकल्याची भीती

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही ७ ते ८ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशामक दल आणि NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Ghatkopar landslide latest news
शिंदेंना मुख्य नेता हे पद कुणी दिलं? धनुष्यबाण दिलाच कसा?, ठाकरेंच्या वकिलांचा आयोगावर शाब्दिक बॉम्ब, कोर्टात काय झालं?

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा

घटनास्थळी ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि चिखलामुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. ढिगारा हटवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती यंत्रसामग्री मागवण्यात आली असून अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com