अकोल्यात उष्णतेचा तीव्र परिणाम
शाळा सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश
तापमान ४४-४५ अंशांवर
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय
अक्षय गवळी, अकोला
अवकाळी पावसानंतर राज्यात तापमाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पार गेला आहे.वाढत्या तापमानामुळे उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. अशातच आता अकोल्यातील सकाळी ११ वाजेपर्यंत शाळा सुरू राहणार असल्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच ११ नंतर शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळेवर प्रशासकीय तथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. वाढत्या तापमानाचा मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून तिथे तापमानाचा पारा ३ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. अकोला देशातील सर्वात उष्ण असणार दुसऱ्या नंबरच शहर ठरलं असून, अकोल्याचे तापमान सलग दोन दिवसांपासून ४४.२ अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे अकोलेकरांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अकोला शहराच्या तापमानात झालेली लक्षणीय वाढ पाहता प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, शाळा सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. ११ नंतर कोणत्याही शाळा सुरु राहणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी असे देखील या आदेशात म्हटले आहे. तसेच ११ नंतर शाळा सुरु ठेवणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरोधात प्रशासकीय तथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
16 एप्रिल : 44.2 अंश सेल्सियस.
15 एप्रिल : 44.2 अंश सेल्सियस.
14 एप्रिल : 44 अंश सेल्सियस.
13 एप्रिल : 43.8 अंश सेल्सियस.
12 एप्रिल : 43.1 अंश सेल्सियस.
11 एप्रिल : 42.1 अंश सेल्सियस.
10 एप्रिल : 40.1 अंश सेल्सियस.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.