

व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत, आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.आता स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी वर्षभर फ्री मोबाईल रिचार्ज मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: घोषणा करत असल्याचा हा व्हिडिओ आहे...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का.? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.या व्हिडिओत मोदींनी मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय. 15 ऑगस्ट रोजी सर्व महिलांना एक वर्षाचा मोफत रिचार्ज दिला जाईल अशी घोषणा केलीय. पण, खरंच 15 ऑगस्टसाठी मोदींनी लाडक्या बहिणींसाठी अशी योजना आणलीय का?
पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ AI मार्फत तयार केलाय
सरकारने आणि पंतप्रधानांनी अशी घोषणा केलेली नाही
अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
आजकाल, सरकारी घोषणा आणि सरकारी योजनांची माहिती असलेले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत.काही लोक पैसे उकळण्यासाठी बनावट लिंकही पाठवतात. त्यामुळे असे मेसेज आल्यास सावध व्हावं. अशा दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या योजनांबद्दलच्या विश्वसनीय माहिती myscheme.gov.in या संकेतस्थळाला दिली जाते. त्यामुळे तुम्हाला असा कोणत्याही योजनेचा मेसेज आला तर या साईटवर तपासा.त्यामुळे आमच्या पडताळणीत स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी वर्षभर फ्री मोबाईल रिचार्ज मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.