माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

GST Deputy Commissioner Bribe Case : माझगावच्या विक्रीकर कार्यालयात ACBची धडक कारवाई करत विक्रीकर उपायुक्तांना अटक केली आहे.
GST Deputy Commissioner Bribe Case
GST BRIBE CASE: ₹8 LAKH BRIBE ALLEGATION; SALES TAX DEPUTY COMMISSIONER ARRESTED
Published On
Summary
  • GST चौकशी बंद करण्यासाठी 15 लाखांची मागणी करून 8 लाखांची लाच स्वीकारल्याचा आरोप

  • तक्रारदाराच्या GST खात्याशी संबंधित चौकशी आणि GST क्रेडिटशी संबंधित नोटीस बंद करण्यासाठी लाच मागितली.

  • माझगाव येथील विक्रीकर कार्यालयात ACBची मोठी कारवाई करण्यात आली.

माझगाव येथील विक्रीकर विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत विक्रीकर विभागातील उपायुक्तांना अटक केली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही धडक कारवाई करत त्यांना माझगाव येथील विक्रीकर विभागाच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.

GST Deputy Commissioner Bribe Case
Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

जीएसटी स्कुटनी आणि जीएसटी क्रेडिटच्या नोटीसची चौकशी थांबवण्यासाठी 15 लाखांची मागणी करून 8 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या राज्यकर उपायुक्तांना अटक करण्यात आली आहे. दीपक क्षीरसागर असं अटक करण्यात आलेल्या उपायुक्ताचे नाव आहे. तपासादरम्यान कोकण भवन (बेलापूर) येथील विक्रीकर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी ही लाच घेतल्याचं निष्पन्न झालंय. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

15 लाखांची मागणी अन् 8 लाखांवर तडजोड

आरोपी अधिकाऱ्याने एका जीएसटी स्कुटनी आणि जीएसटी क्रेडिट नोटीसची चौकशी थांबवण्यासाठी तक्रारदाराकडे 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारासोबत तडजोड करून त्यांनी 8 लाख रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

GST Deputy Commissioner Bribe Case
Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

माझगावमधून अटक

तक्रारदाराच्या अर्जावरून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान दीपक क्षीरसागर यांनी 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने माझगाव येथील विक्रीकर भवन कार्यालयात छापा टाकून त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com