Akola Political News Saamtv
महाराष्ट्र

Akola News: अकोल्यात कॉंग्रेसला धक्का! जिल्हाउपाध्यक्ष संजय बोडखे यांचा तडकाफडकी राजीनामा

Akola Politics: संजय बोडखे यांनी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

हर्षदा सोनुने, प्रतिनिधी

Akola Political News:

अकोला जिल्हातल्या अकोटचे काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेची यशस्वीपणे धुरा चालविणारे माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचे सुपुत्र प्रा. संजय बोडखे यांनी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याकडे राजीनामा पत्र दिले आहे.

अकोला जिल्हा (Akola) काँग्रेस कमिटीची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोटचे संजय बोडखे यांच्यासह तब्बल 29 जणांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आल्या होत्या. तर विस्तारित कार्यकारिणीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना तर काही जुन्या लोकांना समाविष्ट करण्यात आले आहे.

ज्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) विरोधात काम केले, त्यांना सुध्दा नव्या विस्तारित कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच यामध्ये प्रोटोकाल पाळल्या गेला नसल्याचा आरोप काँग्रेस गटातील काहींनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातूनच संजय बोडखे यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. तर जिल्हा काँग्रेसच्या जम्बो विस्तारित कार्यकारिणीमध्ये 2 वरिष्ठ उपाध्यक्ष, 1 कोषाध्यक्ष तर तब्बल 29 उपाध्यक्ष, 37 सरचिटणीस, 1 सरचिटणीस प्रशासन व संघटन, 2 सरचिटणीस प्रशासन, 82 चिटणीस, 81 सहचिटणीस, 1 प्रसिध्दी प्रमुख व कायम निमंत्रित असा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाउपाध्यक्षांनी तडका फडकी राजीनामा दिल्याने चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 'या' दाण्यांचे पाणी, पोटाची चरबी होईल झपाट्याने कमी

Wednesday Horoscope : दिवसभर खिसा रिकामा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

Rahuri By-Election: राहुरी पोटनिवडणूक होणार चुरशीची; ठाकरेंचा हुकमी एक्का उतरला रिंगणात, पण...

David Warner: डेव्हिड वॉर्नरला अटक; क्रिकेट विश्वात खळबळ, नेमकं कारण काय?

Alarm clock history: जुन्या काळात अलार्म नसताना लोकं सकाळी कशी उठायची?

SCROLL FOR NEXT