Pune News: पुण्यात भरणार जागतिक दर्जाचे बागायती फलोत्पादन प्रदर्शन; परदेशी व्यावसायिक, शेतकऱ्यांचा सहभाग

Horticulture Exhibition In Pune: हे प्रदर्शन येत्या गुरुवारपासून (२३, नोव्हेंबर) सुरू होणार असून ते तीन दिवस चालणार आहे.
Horticulture Exhibition In Pune
Horticulture Exhibition In PuneSaamv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी

Pune Breaking News:

पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी. पुणे शहरात जागतिक दर्जाचे बागायती फलोत्पादन प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन येत्या गुरुवारपासून (ता.२३) सुरू होणार असून ते तीन दिवस चालणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना अगदी मोफत पाहता येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे (Pune) शहरात जागतिक दर्जाचे बागायती फलोत्पादन प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन येत्या गुरुवारपासून सुरू होणार असून ते तीन दिवस चालणार आहे. याला हॉर्टीप्रोइंडिया असे नाव देण्यात आले आहे. बागायती फलोत्पादन या विषयावरील हे देशातील सर्वात मोठे प्रदर्शन असणार आहे.

हाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन, असोसिएशन ऑफ एन्व्हाॅयर्न्मेंटल हॉर्टीकल्चर आणि वसू इव्हेंट व हॉस्पिटॅलिटी यांच्यावतीने हे बागायती फलोत्पादन प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून ते सिंचननगर येथील नवीन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात भरविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Horticulture Exhibition In Pune
Jalna Breaking News: धनगर बांधवांच्या मोर्चाला हिंसक वळण; जालना जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

या प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती,गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक सहभागी होणार आहेत.हे प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत मोफत पाहता येणार आहे. (Latest Marathi News)

Horticulture Exhibition In Pune
Ulhasnagar Crime News: जुन्या भांडणाच्या रागातून तब्बल ५ मोटारसायकल जाळल्या; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com