Mumbai Crime News: मुंबईत बोगस आयुर्वेदिक डॉक्टरांचा सुळसुळाट; रक्त तपासणीच्या बहाण्याने वृद्ध आजोबांना १४ लाखांचा गंडा

Crime News: वयोरूद्ध व्यक्तीची ७१० वेळा खोटी रक्त तपासणी करून साडे चौदा लाखांची फसवणूक केली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime Newsसंजय गडदे
Published On

Mumbai Crime News:

राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई गुन्हे शाखेला लोकांची फसवणूक करणाऱ्या बनावट डॉक्टर टोळीला पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Mumbai Crime News: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल; साक्षीदाराला दिली जीवे मारण्याची धमकी

आम्ही युनानी तसेच आयुर्वेदिक डॉक्टर्स आहोत, असे भासवून लोकांची फसणवूक करणाऱ्या टोळीचा गु्न्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एका प्रकरणात या टोळीने वयोरूद्ध व्यक्तीची ७१० वेळा खोटी रक्त तपासणी करून साडे चौदा लाखांची फसवणूक केली आहे. ही धक्कादायक मुंबईत घडली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानूसार, त्यांच्या टीमने आतापर्यंत ४ जणांना या प्रकरणी अटक केलीये. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दक्षिण मुंबईतील एका ६१ वर्षिय व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे. सदर वृद्ध व्यक्ती काही वर्षांपासून ट्रेमर आजाराने ग्रस्त आहे. ११ नोव्हेंबर रोजी ते काही कामानिमित्त नरिमन पॉइंट येथे गेले होते.

तेथे त्यांना काही लोकांनी त्यांच्या शरीराचा थरकाप होत असल्याचे पाहून त्यांना त्यांच्या असलेल्या आजाराबद्गल विचारले आणि कोणत्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे अशी विचारणा केली. यानंतर या टोळीतील एका आरोपीचे स्वत:ची ओळख युनानी डॉक्टर अशी दिली आणि वृद्ध व्यक्तीची फसवणूक केली. मी हा आजार दोन तासांत बरा करू शकतो, असं खोट्या डॉक्टरकडून सांगण्यात आलं होतं.

गुन्हे शाखेच्या युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले की, वृद्ध व्यावसायिक हे आरोपीच्या जाळ्यात अडकलेत. एवढेच नव्हे तर त्यांनी आरोपींना आपल्या घरी नेले. त्यानंतर आरोपींनी उपचार करायचे अशा बहाण्याने त्यांना झोपायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या हातापायावर धातूच्या कोनने जोरात दाबले. मेटलच्या दबावाने शरीराच्या हातापायावर रक्त साचले होते. पुढे आरोपीने रक्त साचलेल्या भागावर थोडेसे ब्लेडने कट लावले. शरीरातून थोडेसे रक्त येताच आरोपीने जिभेने मुलतानी माती लावली. ज्यामुळे रक्त हे पिवळे दिसायला लागले. यानतंर आरोपीने त्या वयोरूद्धास म्हटलं की, तुमच्या शरीरात घाण साचली आहे. त्याकारणामुळे तुमचे रक्त पिवळे दिसत आहे, आता आम्ही ते बरे केले आहे. आजपासून तुमचा आजार पूर्णपणे नाहीसा झाला आहे.

आरोपीने त्या दिवशी एकूण ७१० वेळा व्यावसायिकाचे अशा पद्धतीने रक्त घेतले होते. त्याबदल्यात त्यांच्याकडून साडे चौदा लाख रुपये रोख रक्कम घेण्यात आली होती. त्यादरम्यान व्यावसायिकाने आरोपींकडून मोबाईल क्रमांकही घेतला होता.

प्रकरणाचा सुगावा कसा लागला...?

या प्रकरणानंतर काही वेळाने व्यावसायिकास समजले की, आपला आजार हा जशाच तसा आहे. त्यानंतर त्यांनी त्या आरोपीस फोन लावला असता त्याचा फोन बंद आला. मात्र व्यावसायिकास आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचे समजले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधला.

मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने व्यावसायिकाचा मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज आणि काही तांत्रिक गोष्टींच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यातच वरिष्ठ निरिक्षक दीपक आणि समीर मुजावर यांना आरोपी मोहम्मद शेरू हा मालेगावात आढळून आला. त्याच्या चौकशीदरम्यान मोहम्मद नफीस शरीफ, मोहम्मद आसिफ निसार आणि मोहम्मद आसिफ शरीफ यांना भिवंडी, ठाणे आणि इतरत्र मनोर येथून अटक करण्यात आली. त्याच्या पोलीस चौकशीत त्याच्या आणखी दहा साथीदारांची नावे पोलिसांच्या समोर आलीत.

पोलिसांनी अटक करण्यात आलेले आरोपी तसंच त्यांचे फरार साथीदार हे राजस्थान येथील आहेत. हे आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध भागात उपचाराच्या नावाखाली फसवणुकीचा हा धंदा करत होते हे लोक रूग्णालयाच्या बाहेर किंवा बागेत कोणीतीही वृद्ध व्यक्ती आजारी दिसली किंवा फिरताना दिसली की, ते त्याच्याकडे जाऊन उपचाराच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करतात, तशीच त्यांनी त्या नरिमन पॉइंटच्या व्यावसायिकाची फसवणूक केली.

आरोपींनी फसवणुकीतून एवढी कमाई करुन सुद्धा हे कोणत्याही महागड्या किंवा स्वस्त हॉटेलमध्ये मुक्काम करत नव्हते, तर एखाद्या अज्ञात ठिकाणी तंबू ठोकून तिथेच झोपायचे. तसंच त्यांचे काम झाल्यावर लगेच आपले सिम बदलायचे. मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्याकडून ९ मोबाईल फोन आणि अनेक सिमकार्ड जप्त केले आहेत.

Mumbai Crime News
Pimpri-Chinchwad Cime News: सोशल मीडियावर PM नरेंद्र मोदी-अमित शहा यांची बदनामी; पिंपरी चिंचवडमधील तरुणाला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com