Akola Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Prostitution Racket In Akola: अकोल्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकत पोलिसांनी देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईवेळी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं.

Priya More

Summary -

  • अकोल्यात हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेट उघड

  • पोलिसांनी छापा टाकून ३ जणांना ताब्यात घेतले

  • दोन महिला आणि एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

  • व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्यवहार चालत असल्याचा खुलासा

अक्षय गवळी, अकोला

अकोला पोलिसांनी हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकत २ विदेशी महिला आणि एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं. अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरक्षण रोड परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. खदान पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून या देहविक्री व्यवसायाची खात्री करून छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान दोन महिला आणि एका पुरूषाला फ्लॅटमध्ये नको त्या अवस्थेत पकडण्यात आले.

प्रति ग्राहकांकडून ३ ते ४ हजार रुपये घेत या महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर तरुणींचे फोटो पाठवून सौदे ठरायचे. आज स्थानिक पोलिसांनी हा संपूर्ण हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. जवळपास दीड ते दोन तास घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी होती. उच्चभ्रू वस्तीतील देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

काही गरजू महिलांसह तरुणींना पैशांचं आमिष दाखवत या ठिकाणी देहविक्रीचा धंदा चालायचा अशी प्राथमिक चौकशीतून माहिती समोर आली आहे. या महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरूषाला ताब्यात घेत खदान पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी अनैतिक व्यापार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या देहविक्री रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? याचा देखील तपास सुरू आहे. ही कारवाई खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sunday Megablock : रविवारी प्रवाशांचे होणार मेगा हाल, 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

SCROLL FOR NEXT