Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: '२४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण दिलं नाही तर...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; भुजबळांवरही साधला निशाणा

Manoj Jarange Patil Sabha: "मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे लिहून घेतलेलं आहे. त्यात जर बदल झाला तर तुमचं अवघड आहे. आम्हाला त्याच पद्धतीने आरक्षण हवं आहे आणि आम्ही तेच घेऊन राहणार..." असेही जरांगे पाटील म्हणाले.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल, वाशिम|ता. ५ डिसेंबर २०२३

Manoj Jarange Patil Sabha:

मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या सुरु आहे. आज (मंगळवार, ५ डिसेंबर) दौऱ्याच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या अकोला तसेच वाशिम जिल्ह्यात सभा झाल्या. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास सरकारला जड जाईल.. असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"आतापर्यंत मराठा ओबीसीत असलेल्या 35 लाख नोंदी सापडल्या. मग या अगोदर मराठा ओबीसीत नाही हे कोणी सांगितलं? त्यांचं नाव आता मराठ्यांना कळायला हवं. जर हेच आरक्षण मराठ्यांना 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज मराठा जगाच्या पाठीवर एक नंबर म्हणून राहिला असता," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर (Chhagan Bhujal) निशाणा साधला. "पूर्वीपासूनच मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्र आहोत, मात्र त्यांना वाटतं की ओबीसी आरक्षणात आपण सुरक्षित नाहीये, असं ओबीसी आरक्षणतील 29 जातींच असं म्हणणं आहे.." असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"सरकारने आरक्षणाच्या निर्णयासाठी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतलाय. महाराष्ट्राच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला कायदा पारित होईल. मात्र 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण जर नाही दिलं तर सरकारला जड जाईल..." असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

"मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे लिहून घेतलेलं आहे. त्यात जर बदल झाला तर तुमचं अवघड आहे. आम्हाला त्याच पद्धतीने आरक्षण हवं आहे आणि आम्ही तेच घेऊन राहणार..." असेही जरांगे पाटील म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओबीसी बांधवांनी दाखवले काळे झेंडे...

दरम्यान, अकोल्यातील सभा आटोपून वाशिमकडे (Washim) जाताना मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील तामसे फाट्यावर हा प्रकार घडला. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जात असताना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT