Manoj jarange Patil: 'मराठा, मुस्लिम , धनगर एक व्हा, एकत्र लढू आणि आरक्षण मिळवू..." मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

Manoj Jarange Patil: "मी पहिल्यांदा येवढ्या मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज जमल्याचे पाहिले. तुम्ही अशी एकी दाखवली तर राज्यात समतेचा आणि शांततेचा संदेश जाईल. विरोध करणाऱ्याला मी घाबरत नाही आणि मोजत सुद्धा नाही," असा टोला जरांगे पाटलांनी लगावला.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

हर्षदा सोनोने, अकोला|ता. ५ डिसेंबर २०२३

Manoj Jarange Patil Sabha Akola:

मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या सुरु आहे. त्यांच्या दौऱ्याचा आजचा पाचवा दिवस असुन काल झालेल्या खामगाव, बुलढाणा सभेनंतर आज जरांगे पाटील यांची पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अकोल्यातील पातूर तालुक्यातील चरणगावं याठिकाणी तोफ धढाडणार आहे. त्याआधी जरांगे पाटील यांचे बाळापुरमध्ये मुस्लिम बांधवांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आज अकोला (Akola) जिल्ह्यात सभा होणार आहेत. यावेळी बाळापूर येथे मुस्लिम बंधावाकडून मनोज जरांगे पाटील यांचे ढोल ताशे वाजवत आणि फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांनी हजरत शहा शरफोद्दीन अवलिया इतराम यांना चादर चढवली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम बांधवांना आरक्षणाच्या लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"अनेक वर्षे आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं.पण आता सामान्य मराठ्यांनी ते मिळवायच ठरवलं.मुस्लिम समाजात ही गरिबी आहे. त्यांची ही आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केली पाहिजे. राज्यातल्या मुस्लिम समाजाने एकत्र येऊन लढा उभा केला पाहिजे. आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू हा शब्द आहे," असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Gondia News: गोंदिया लोकसभा लढवण्यास प्रफुल्ल पटेल सज्ज? होर्डिंगने वाढवली भाजप नेत्यांची चिंता

सरकारला इशारा...

"नुसतं भाषण ठोकून काही होणार नाही. मला मराठा बांधवांच्या वेदना जश्या माहिती आहेत तसच धनगर आणि मुस्लिम समाजाच्या सुद्धा वेदना मला माहिती आहेत. मुख्य प्रवाहात आपण आलो नाही तर आपली लेकरं दारिद्र्यात जगतील. मराठा, धनगर आणि मुस्लिम एकत्र आले तर सरकारला बाथरूमच्या बाहेर सुद्धा पडता येणार नाही," असा इशाराही जरांगेंनी यावेळी दिला.

विरोधकांवर निशाणा..

" या शहरात मी पहिल्यांदा येवढ्या मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज जमल्याचे पाहिले. तुम्ही अशी एकी दाखवली तर राज्यात समतेचा आणि शांततेचा संदेश जाईल. विरोध करणाऱ्याला मी घाबरत नाही आणि मोजत सुद्धा नाही," असा टोला जरांगे पाटलांनी लगावला.

मुस्लीम, धनगर बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन...

"माझ्यासमोर करोडो मराठ्यांची ताकद आहे. मुस्लिम बांधवांना विनंती आहे. लेकरासाठी एक व्हा. आरक्षण आपला हक्क आहे. लवकर एक व्हा आपण मराठा, मुस्लिम आणि धनगर एकत्र लढू आणि आरक्षण मिळवू.." असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Pune School Bus Accident VIDEO: विद्यार्थ्यांनी भरलेली बस झाडावर आदळली; मुलांच्या किंचाळ्या, नागरिकांची पळापळ CCTV मध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com