Pune School Bus Accident VIDEO: विद्यार्थ्यांनी भरलेली बस झाडावर आदळली; मुलांच्या किंचाळ्या, नागरिकांची पळापळ CCTV मध्ये कैद

Pune School Bus Accident CCTV Footage : पुण्यात स्कूल बसला भीषण अपघात झाला. बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Pune School Bus Accident CCTV
Pune School Bus Accident CCTVSaam TV

अक्षय बडवे

Pune Bus Accident :

पुण्यात स्कूल बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव बस झाडावर आदळली आहे. अपघात झाला त्यावेळी शाळकरी मुले देखील बसमध्ये होते. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचं थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. सोमवारी ४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र वाटेतच ही बस झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले. (Latest Marathi News)

Pune School Bus Accident CCTV
Pune Bhidewada Demolished : पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा; महापालिकेकडून याठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार

अचानक घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यी मोठमोठ्याने रडत होते. मात्र उपस्थित नागरिकांना त्यांना धीर देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानी कुणालाही गंभीर इजा झाली नाही. (Live Marathi News)

Pune School Bus Accident CCTV
Pune Mumbai Expressway Block: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक; कारसाठी जुना महामार्ग पर्याय

बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com