Pune Bhidewada Demolished : पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा; महापालिकेकडून याठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार

Pune Bhidewada Demolished News : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली.
Pune Bhidewada Demolished
Pune Bhidewada DemolishedSaam Tv
Published On

नितीन पाटणकर

Pune News :

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू केली तो भिडेवाडा रात्री पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आला. त्या ठिकाणी आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे.

भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून महापालिकेने रात्री ११ वाजेनंतर वाडा पाडण्याचा निणर्य घेतला. त्यानुसार रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात वाडा पाडल्याने अखेर भिडेवाडा इतिहासजमा झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Bhidewada Demolished
Pune News: १५ दिवसात पुण्यातील ४० हजार दुकानांवर झळकणार 'मराठी' पाट्या; मनसे पदाधिकारी- व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय!

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती.

त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली असून हा वाडा जमीनदोस्त करण्यात आला. या जागेवर आता पुणे महापालिकेने नोटीस लावली आहे. (Latest Marathi News)

सदर मिळकती पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे असून मिळकतीवर कोणतेही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई जाईल अशी नोटीस महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून या ठिकाणी लावण्यात आली आहे.

Pune Bhidewada Demolished
Mumbai 26/11 Attack Mastermind: मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंडवर पाकिस्तानच्या तुरुंगात विषप्रयोग: रिपोर्ट्स

सुप्रीम कोर्टाने महापालिकेच्या बाजूने निर्णय देत भिडे वाडा पालिकेला ताब्यात घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार महापालिककेने भिडेवाडा ताब्यात घेत कारवाई केली आहे. येथील स्थानिक दुकानदारांचा त्याला विरोध होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com