Beed News: बीडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी, मराठा आंदोलकांकडून विरोध

Beed Political News: जवळपास 1500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.
Beed News
Beed NewsSaam TV
Published On

Shasan Aplya Dari Program:

आज बीडच्या (Beed) परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मराठा समाजाकडून विरोध केला जातोय. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत कार्यक्रम नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Maharashtra Politics: महादेवा मला मंत्री करा, भरत गोगावलेंचं साकडं; कार्यकर्त्यांनाही केली प्रार्थनेची विनंती

मराठा समाजाकडून विरोध

कार्यक्रमाला मराठा समाजाकडून विरोध केला जातोय. परळी तालुक्यातील कौवडगाव हुडा गावात समस्त मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रमाला विरोध दर्शविणारे बॅनर झळकत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत कार्यक्रम नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

दरम्यान, परळी तहसीलसमोरील ग्राउंडवर कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु आता मराठा समाजाने विरोध दर्शविल्याने प्रशासन नेमकी काय भूमिका घेते? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

1500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात

मराठा समाजाकडून झालेल्या विरोधामुळे पोलीस प्रशासनाने कार्यक्रमस्थळी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. जवळपास 1500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मोठी सुरक्षाव्यवस्थाही ठेवण्यात आलीये.

मराठा, धनगर समाजासह इतर समाजांचे आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याच पाश्वभूमीवर परळीत येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांना कुणाच्याही रोषाचा सामना करावा लागू नये किंवा ऐनवेळी काही गोंधळ उडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सर्व घटनांवर लक्ष देवून आहेत.

कार्यक्रमस्थळी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात केला गेला आहे. या बंदोबस्तासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अपर पोलीस अधिक्षक, 6 पोलीस उपअधिक्षक, 20 पोलीस निरीक्षक, 80 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह 850 पोलीस (Police) कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची 1 तुकडी, दंगल नियंत्रण पथकाच्या 4 तुकड्या आणि 300 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी परळीला जाणार 580 बस; राज्य परिवहन महामंडळाकडून सोय..

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून बीडमधील 300 व इतर जिल्ह्यांतील 280 अशा 580 बसच्या विशेष फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना बसअभावी प्रवासाचा त्रास होऊ नये, म्हणून इतर विभागातील 280 बस मागविण्यात आल्या आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी जाणाऱ्या प्रवाशांना विशेष बस फेऱ्यांचा लाभ घेता येणार असल्याचे विभागीय वाहतूक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Beed News
Pune Crime: नंबर प्लेट नसल्याने संशय आला अन्.. पुण्यात बाईक चोरी करणाऱ्या तिघांना अटक; १५ दुचाकी जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com