Akola Congress Leader Seatback News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाअध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण आले समोर

Akola Congress Leader Seatback News : अकोल्यातील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अकोल्यातील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी राजीनामा दिला

  • स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली

  • अकोला महापालिकेत ८ स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली

  • या निर्णयामुळे अकोला राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे

अक्षय गवळी, अकोला

Akola Congress Leader Kapil Raodev Seatback अकोल्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे नाराज असलेल्या रावदेल यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

कपिल रावदेव हे अकोला शहरातील काँग्रेसचे जुने, निष्ठावंत आणि वैचारिक फळीतील प्रमुख नेते समजले जातात. काँग्रेसमधला ब्राह्मण समाजातला प्रमुख आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून कपिल रावदेल यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. काँग्रेसने सातत्याने डावल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं रावदेव यांनी स्पष्ट केल.

अकोला महापालिकेच्या ८ स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. आठपैकी ४ जागा सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांच्या 'अकोला सुधार आघाडी'ला मिळाल्या आहेत. तसेच विरोधक असलेल्या काँग्रेसला दोन तर शिवसेना ठाकरे गटाला आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी १ स्वीकृत नगरसेवक मिळाला आहे.

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये माजी उपमहापौर सुनील मेश्राम, महिला आघाडीच्या नेत्या चंदा शर्मा, ॲड. गिरीश गोखले आणि ॲड. देवाशिष काकड यांना संधी मिळाली. काँग्रेसकडून आमदार साजिद खान पठाण यांचे बंधू गुड्डू पठाण आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांना संधी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेत अत्यल्प मतांनी पराभूत झालेले कौलखेड भागातील लिंगायत समाजाचे जेष्ठनेते शंकरआप्पा लंगोटे यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील इन्नानी यांना आपल्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT