shambhavi pathak death : Saam tv
महाराष्ट्र

बारामती अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू; पायलट शांभवी पाठक कोण होत्या?

shambhavi pathak death : बारामती विमान अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झालाय. या विमानात पायलट शांभवी पाठक यांचाही अपघाती मृत्यू झाला.

Vishal Gangurde

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ जणांचा बारामती विमान अपघातात मृत्यू

अपघातावेळी पायलट शांभवी पाठक आणि इतर कर्मचारी होते. The Times of India

विमान धावपट्टीवर उतरत असताना अपघात झाला

पुण्याच्या बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांसोबत विमानात पायलटसह पोलीस शिपाई देखील होते. त्यांच्याही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विमानात मुंबईच्या पायलट शांभवी पाठक यांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र हळहळला आहे.

विमानात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ जण विमानात होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना विमान विमानाला आग लागली. लँडिगदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेवेळी लागलेल्या आगीमुळे त्यांना वाचवता आले नाही. अपघातात अजित पवारांसह कर्मशियल पायलट शांभवी पाठक यांचाही अपघाती मृत्यू झाला.

शांभवी पाठक कोण होत्या?

पायलट शांभवी पाठक यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठात एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात बीएससी पदवी प्राप्त केली. पायलट होण्यासाठी शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधील न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी येथून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले.

२०१८ ते २०१९ या कालावधीत त्यांनी तेथे व्यावसायिक उड्डाणाचे (प्रोफेशनल फ्लायिंग) प्रशिक्षण पूर्ण केले. याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीकडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळाले.

व्हीएसआर कंपनीच्या खासगी विमानात एकूण ५ जण होते. या विमानात उपमुख्यी अजित पवार, मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, पायलट शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : उद्या सकाळी ११ वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

मुलगा सकाळी सकाळी घरातून बाहेर पडला, टीव्हीवर विमान अपघातात मृत्यूची बातमी बघितली अन् आईच्या अश्रूंचा बांध फुटला

Maharashtra Live News Update: केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे विमानतळावर दाखल

Plane Crash Reason: विमानाला आग कशी लागते? ही आहेत 4 धक्कादायक कारणे

Ajit Pawar Death: अजित पवारांचा टेकऑफपूर्वीचा विमानातील शेवटचा फोटो समोर

SCROLL FOR NEXT