NCP (Ajit Pawar group) leaders resign in Ratnagiri, dealing a fresh setback to Ajit Pawar ahead of ZP elections. saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

NCP Leader Resignation In Ratnagiri: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी रत्नागिरीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय. येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय.

Bharat Jadhav

  • जिल्हा परिषद निवडणुकीआधी अजित पवार गटाला आणखी एक धक्का

  • रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

  • पुणे, कोल्हापूरनंतर रत्नागिरीतही नाराजीचा फटका

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी अजित पवार गट तयारीला लागलाय. जिल्ह्या जिल्ह्यात बैठका आणि आणि पक्षांची मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र दुसऱ्याकडे अजित पवार गटाला धक्क्यांवर धक्के लागत आहेत. रत्नागिरीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला दिवसभरातून तिसरा धक्का लागलाय.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पुणे, कोल्हापूरनंतर रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र ऊर्फ बंटी वणजू आणि शहराध्यक्ष अ‍ॅड. राकेश आंब्रे यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडालीय.

महायुतीमधील गलिच्छ राजकारणाला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. त्यामुळे पुढील काळात रत्नागिरीत महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील जागावाटपावरून आणि "गलिच्छ राजकारणाला" कंटाळून हा निर्णय घेतला असं पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र ऊर्फ बंटी वणजू आणि शहराध्यक्ष अ‍ॅड. राकेश आंब्रे म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी महायुतीत राष्ट्रवादीबद्दल तक्रार केली होती. त्यावर वणजू यांनी सडेतोड उत्तर दिलं. "नगरपालिका निवडणुकीत आम्हाला दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात एकही जागा दिली नाही. त्यामुळे कटू अनुभव आम्हालाच आला," असे वणजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

यापुढे केवळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करू, कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नसेल," असेही वणजू आणि आंब्रे यांनीही सांगितले. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीची कार्यकारणी मजबूत असणं आवश्यक असतं. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन प्रमुख नेत्यांनी 'अलिप्त' राहण्याचा निर्णय घेतल्यानं राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असल्याचं मानलं जात आहे.

पुणे जिल्हा परिषदेसाठी रणनीती ठरली

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील एकोप्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर लढवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत टँकर दुचाकीचा भीषण अपघात

Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Wednesday Horoscope: राजकारण्यांसाठी उत्तम दिवस, काहींना महत्वाच्या कामात अडथळे, ४ राशींची चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT