ajit pawar faction leaders meet sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटास खिंडार? 137 पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला

Maval Political News : शरद पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दिलीप कांबळे

Maval :

मावळ मधील अजित पवार गटातील (ajit pawar faction) नाराज 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज (साेमवार) ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची प्रत्यक्ष भेट घेतली. येत्या गुरुवारी शरद पवार हे मावळ (maval) तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा घेणार आहेत. त्यामुळे पवार यांच्या समवेत झालेली 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मावळ मधील अजित पवार गटातील नाराज असलेल्या 137 जणांनी आपला राजीनामा काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (pradip garatkar) यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मावळ मध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता.

आता मावळ मधील अजित पवार गटातील नाराज 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज (साेमवार) शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. येत्या गुरुवारी शरद पवार हे मावळ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा घेणार आहेत. (Maharashtra News)

यावेळी मावळ तालुक्यातील अजित पवार गटातील नाराज 137 जण शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षात यांच्या प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्यात तुतारी वाजण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT