one lakh crore mou signed in advantage chandrapur says sudhir mungantiwar
one lakh crore mou signed in advantage chandrapur says sudhir mungantiwar saam tv

Advantage Chandrapur : चंद्रपुरमध्ये उद्योजकांकडून एक लाख कोटींचे सामंजस्य करार, एक लाख नव्या रोजगाराची निर्मिती

चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ उभारणी, रेल्वे संदर्भातील सर्व निर्णय वेगवान पद्धतीने घेतले जाणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Chandrapur :

चंद्रपुर शहरात दोन दिवसीय ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर २०२४ -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ या औद्योगिक महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या महाेत्सवाच्या पहिल्याच दिवशी 19 उद्योजकांनी सुमारे एक लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. यावेळी उद्योजकांच्या पाठिशी आम्ही खंबीर आहाेत असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले. (Maharashtra News)

'ॲडव्हान्टेज चंद्रपूर २०२४ -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ या औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन आज वन अकादमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राज्याचे कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (mangal prabhat lodha), पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गाैडा आदी उपस्थित होते.

one lakh crore mou signed in advantage chandrapur says sudhir mungantiwar
Nitesh Rane On Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांना आता मराठा समाज गांभीर्याने घेत नाही : नितेश राणे

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राकृतिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संसाधनांची उपलब्धता पाहून यावेळी १९ उद्योगांनी ७५ हजार ७२१ कोटींचे सामंजस्य करार केले. यामध्ये कोल गॅसिफिकेशन- मायनिंग व इतर अनेक उद्योगांचा समावेश आहे. एकटा मित्तल समूह चंद्रपूर जिल्ह्यात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून स्टील उत्पादनात चंद्रपूर जिल्हा आता अग्रेसर राहण्याची शक्यता आहे.

या सर्व उद्योगांच्या माध्यमातून सुमारे एक लाख नवी रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वच उद्योजकांना एक खिडकी योजना राबवण्याची हमी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात येत्या काळात विमानतळाची उभारणी होणार असून रेल्वे संदर्भातील सर्व निर्णय वेगवान पद्धतीने घेतले जाणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

one lakh crore mou signed in advantage chandrapur says sudhir mungantiwar
Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com