Ajit Pawar Last Photo Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजित पवारांचा टेकऑफपूर्वीचा विमानातील शेवटचा फोटो समोर

Ajit Pawar Last Photo: अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांचे विमान बारामतीमध्ये कोसळले. या अपघातापूर्वीचा अजित पवार यांचा विमानात बसलेला शेवटचा फोटो समोर आला आहे.

Priya More

Summary:

  • अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले

  • बारामतीत त्यांच्या विमानाला अपघात झाला

  • बारामती एअरपोर्टजवळ त्यांचे विमान कोसळलं

  • या विमान अपघातापूर्वीचा अजित पवारांचा शेवटचा फोटो समोर आला आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे विमान आज सकाळी बारामतीमध्ये कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. या अपघातापूर्वीचा विमानातील अजित पवार यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अजित पवार यांचा विमानामध्ये बसल्यानंतर काढण्यात आलेला शेवटचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अजित पवारांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेले असून त्यांनी गॉगल लावला दिसत आहे. ते विमानातून खाली बघताना दिसत आहे. तर अजित पवार यांच्या शेजारी त्यांचे सुरक्षारक्षक विदीत जाधव बसल्याचे दिसत आहे.

मुंबईवरून ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले होते. त्याचवेळी विदीत जाधव यांनी अजित पवारांसोबत फोटो घेतला होता. हाच फोटो अजित पवार यांचा शेवटचा फोटो ठरला आहे. तसंच विदीत जाधव यांचा देखील हा शेवटचा फोटो ठरला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरला बसला आहे. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT