Shruti Vilas Kadam
सायकलिंग हा उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. रोज २० मिनिटं सायकल चालवल्याने कॅलरी बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत मिळते.
नियमित सायकलिंगमुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते. यामुळे हृदय अधिक कार्यक्षम बनते आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.
सायकलिंग करताना मांडी, पोटरी आणि कंबरेचे स्नायू सक्रियपणे काम करतात. त्यामुळे खालच्या शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढते.
धावण्याच्या तुलनेत सायकलिंग हा कमी प्रभावाचा (Low Impact) व्यायाम आहे. त्यामुळे गुडघे आणि सांध्यांवर कमी ताण येतो, तसेच फिटनेस टिकवून ठेवता येतो.
सायकलिंग केल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन्सचे प्रमाण वाढते. यामुळे मन प्रसन्न राहते, तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
सायकल चालवताना श्वसनक्रिया अधिक प्रभावी होते. त्यामुळे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
रोजच्या सायकलिंगमुळे शरीराची सहनशक्ती वाढते. दिवसभर उत्साही वाटते, थकवा कमी जाणवतो आणि दैनंदिन कामे अधिक सहजपणे करता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.