Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Shruti Vilas Kadam

घरात केस सैल बांधा किंवा मोकळे ठेवा

सतत घट्ट पोनीटेल किंवा हेअरस्टाइल केल्याने केसांच्या मुळांवर ताण येतो. घरात असताना केस मोकळे किंवा सैल बांधल्याने तुटणे आणि गळणे कमी होऊ शकते.

Hair Care | Saam TV

गरजेपेक्षा जास्त शॅम्पू वापरणे टाळा

टाळू तेलकट वाटत असल्यामुळे अनेकजण वारंवार शॅम्पू करतात. मात्र यामुळे टाळूचा तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि गरजेनुसारच शॅम्पू वापरा.

Hair Care | Saam Tv

सूती टॉवेलने केस वाळवा

केस धुतल्यानंतर जोरात घासण्याऐवजी सूती टॉवेल किंवा टी-शर्टने हलक्या हाताने पाणी शोषून घ्या. यामुळे केसांचा कोरडेपणा आणि गुंता कमी होतो.

Hair Care | Saam tv

कंगवा नियमित स्वच्छ ठेवा

अस्वच्छ कंगव्यामध्ये धूळ, तेल आणि जंतू साचू शकतात. त्यामुळे स्वच्छ केसही खराब होण्याचा धोका वाढतो. आठवड्यातून किमान एकदा कंगवा स्वच्छ धुवा.

Hair Care | Saam Tv

टाळूच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या

निरोगी केसांची सुरुवात निरोगी टाळूपासून होते. महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा टाळू स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यावर भर द्या.

Hair Care | Saam Tv

नियमित हेअर ट्रिमिंग करा

केसांना सारखे फाटे फुटत असतील तर वेळोवेळी ट्रिमिंग करणे आवश्यक आहे. यामुळे केस अधिक दाट, सुंदर दिसतात.

Hair care | Saam Tv

टाळूची हलक्या हाताने मसाज करा

दररोज काही मिनिटे टाळूची मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळण्यास मदत होते आणि केस अधिक निरोगी राहू शकतात.

Hair Care | Saam tv

Pune: पुण्यात एकूण किती आणि कोणत्या पेठा आहेत? पुणेकर तुम्हाला माहिती आहेत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

pune | saam Tv
येथे क्लिक करा