Pune: पुण्यात एकूण किती आणि कोणत्या पेठा आहेत? पुणेकर तुम्हाला माहिती आहेत का?

Shruti Vilas Kadam

पुण्यात आहेत 17 प्रमुख ऐतिहासिक पेठा

पुणे शहरात एकूण 17 ऐतिहासिक पेठा मानल्या जातात. पेशवेकाळात या पेठांचा विकास झाला असून आजही त्या शहराच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहेत.

Pune city

वारांनुसार नाव असलेल्या पेठा

पुण्यात सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ आणि रविवार पेठ अशा वारांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेठा आहेत.

City of Pune

पेशव्यांच्या काळात झाला विस्तार

18व्या शतकात पेशव्यांनी शहराचा विस्तार करताना विविध व्यापारी आणि निवासी भाग विकसित केले. याच काळात अनेक पेठांची स्थापना झाली.

Pune city | yandex

पुण्यातील इतर महत्त्वाच्या पेठा

सदाशिव पेठ, नारायण पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, गंज पेठ (महात्मा फुले पेठ) , कसबा पेठ, नवापेठ आणि घोरपडे पेठ या पुण्यातील प्रसिद्ध पेठा आहेत.

Pune | Google

प्रत्येक पेठेची वेगळी ओळख

काही पेठा व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही धार्मिक स्थळे, वाडे, बाजारपेठा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या भागांसाठी ओळखल्या जातात.

Wada | yandex

पुण्याच्या संस्कृतीचे केंद्र

पुण्यातील पेठा या गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र मानल्या जातात.

Pune City | .freepik.com

आजही जपला जातो ऐतिहासिक वारसा

आधुनिक पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी जुन्या पेठा आजही शहराचा इतिहास, वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत आहेत.

Shaniwar Wada

Bollywood Actress: बॉलिवूडच्या पहिल्या १०० कोटींचा चित्रपट देणारी ही अभिनेत्री माहिती आहे का?

Bollywood Actress | Saam Tv
येथे क्लिक करा