Bollywood Actress: बॉलिवूडच्या पहिल्या १०० कोटींचा चित्रपट देणारी ही अभिनेत्री माहिती आहे का?

Shruti Vilas Kadam

दक्षिण चित्रपटसृष्टीतून झाली सुरुवात

असिन थोट्टुमकलने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तिने मोठे यश मिळवले.

Bollywood Actress

‘गजनी’ने दिली खास ओळख

2008 मध्ये आमिर खानसोबत ‘गजनी’ या चित्रपटातून असिनने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातील ‘कल्पना’ची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

Bollywood Actress

बॉलिवूडचा पहिला 100 कोटींचा चित्रपट

‘गजनी’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला 100 कोटींची कमाई करणार चित्रपट ठरला. या यशामुळे असिन रातोरात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली.

Bollywood Actress

अनेक सुपरस्टार्ससोबत केलं काम

असिनने सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण आणि आमिर खान यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. ‘रेडी’, ‘हाऊसफुल 2’, ‘बोल बच्चन’ आणि ‘खिलाडी 786’ हे तिचे गाजलेले चित्रपट ठरले.

Bollywood Actress

करिअरच्या शिखरावर घेतला मोठा निर्णय

अनेक हिट चित्रपट दिल्यानंतरही असिनने चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिचा शेवटचा चित्रपट ‘ऑल इज वेल’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला.

Bollywood Actress

उद्योगपती राहुल शर्मासोबत विवाह

2016 मध्ये असिनने मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर तिने पूर्णपणे कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेत फिल्म इंडस्ट्री सोडली.

Bollywood Actress

आता लाइमलाइटपासून दूर

लग्नानंतर असिनने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आणि सार्वजनिक जीवनापासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला. ती सध्या पती आणि मुलीसोबत छान आयुष्य जगत आहे.

Bollywood Actress

Kharik Benefits: हाडे मजबूत होतात, हिमोग्लोबिन वाढवते...; रोज सकाळी 2 खारिक खल्ल्याने होतात हे फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharik Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा