मुंबईत धावतेय जीवघेणी 'बेस्ट' बस; बेस्टची काटकसर मुंबईकरांच्या जीवावर? VIDEO

Mumbai Best bus accident : मुंबईकरांचा बेस्ट प्रवास आता जीवघेणा ठरत चाललाय. रस्त्यावर चालणाऱ्या मुंबईकरांचा बळी जाण्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत. बेस्टचे अपघात का वाढले आहेत? कोण याला जबाबदार आहे? यावरचा हा रिपोर्ट.........
Best bus accident
Mumbai Best bus accident Saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

मुंबई उपनगरीय रेल्वेपाठोपाठ मुंबईकरांची दुसऱ्या क्रमांकाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच झालेल्या मालाडमधील अपघातानंतर आता दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 12 जण या अपघातात जखमी झालेत. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, मुंबईत अलीकडच्या काळात बेस्ट बस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय.

29 डिसेंबर 2025

भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर बेस्ट बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला होता. तर 8 ते 10 जण गंभीर झाले होते.

14 मे 2026

अंधेरीतील जेपी रोडवर बेस्टच्या 4 बसेस एकमेकांवर आदळल्यानं विचित्र अपघात घडला होता. या अपघातात एका बसचा कंडक्टर मृत्यू झाला होता.

04 जून 2026

मालाड परिसरात बेस्ट बसची उभ्या कारला धडक बसून झालेल्या अपघातात 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Best bus accident
जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

दरम्यान याआधी बेस्टचे अपघात झाल्यानंतर चालकांना महिन्याभर प्रशिक्षण दिल्याचं बेस्ट समिती अध्यक्षांनी सांगितलयं... मात्र यावेळी बसचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला आणि बस ड्रायव्हरनं टर्न मारून अनेकांचे जीव वाचवल्याचा अजब दावाही बेस्ट समिती अध्य्क्ष तृष्णा विश्वासराव यांनी केलाय.

मात्र बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आधी का लक्षात आलं नाही... बसचा मेन्टनेन्स वेळोवेळी का करण्यात येत नाही? असे गंभीर सवाल उपस्थित झाले आहेत.

मुंबईतील वाढत्या बेस्ट बस अपघातांमुळे मुंबईकरांचा प्रवास जीवघेणा ठरतोय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास म्हणून लाखो मुंबईकर आजही बेस्टच्या प्रवासाला पंसती देतात.

Best bus accident
Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

मात्र, गेल्या काही वर्षांत या सुरक्षित बेस्ट बसचे अपघात वाढत चालले आहेत. त्यातही बेस्टने घेतलेल्या भाडेतत्वावरील बसेसचं अपघात होण्याचं प्रमाण अधिक आहे. खरं तर, बेस्ट प्रशासनानं आर्थिक काटकसर करण्यासाठी आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसेसचा समावेश केला. मात्र, बेस्ट प्रशासनाच्या याच काटकसरीमुळे मुंबईकरांचा रोजचा प्रवास मात्र असुरक्षित बनलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com