

गुजरातच्या सूरतमध्ये अपघाताचा थरार
दोन्ही बस एकमेकांना धडकल्याने घडला भीषण अपघात
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली महत्वाची माहिती
गुजरातच्या सूरतमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. महाराष्ट्रातील दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. दोन्ही बस एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या अपघातविषयी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अधिकृत माहिती दिली.
सूरतमधील उवा गावातून जाणाऱ्या दोन्ही एसटी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस उलटल्यानंतर अनेकांची धावाधाव झाली. बसमधील प्रवाशांच्या किंचाळ्यामुळे परिसरात खळबळ उडाली. दोन्ही बसचा चक्काचूर झाला. या अपघाताविषयी अधिकृत माहिती सांगताना जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, 'अपघात झालेली बस ही जळगावच्या जामनेर आगाराची असून ती सकाळी साडेसात वाजता सुरतकडे रवाना झाली होती'.
'या बसचे चालक घनश्याम बरकले यांचा अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातातील जखमींमध्ये एक प्रवासी जळगावच्या पाचोरा येथील असून ते सुखरूप असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेले प्रवासी पूर्णपणे जळाले आहे. मृत पावलेल्या प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले.
'मृत व्यक्तींची ओळख पटलेली नसल्यामुळे ते नेमके कुठले हे अद्याप समोर आलेलं नाही. मृत व्यक्तींचे डीएनए नमुने घेण्याचं काम सुरू असल्याचं जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले. सुरतमधील बारडोली येथील जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी यांच्याशी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपर्क साधला आहे. घटनेत जळगाव जिल्ह्यातील जखमी तसेच मृत व्यक्तीला जळगाव जिल्ह्यात आणण्यासाठी उपायोजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी संगितले.
'जळगावातून एक टीम मदतीसाठी रवाना झाली आहे. अपघाताबद्दल नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरू नये. तसेच अधिकृत माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.