Radha Krishna Vikhe Patil Criticized Balasaheb Thorat Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Politics: ...म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निशाणा

Radha Krishna Vikhe Patil Criticized Balasaheb Thorat: जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Priya More

सचिन बनसोडे, शिर्डी

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर जिल्ह्यामध्या जाळपोळ, तोडफोड आणि आंदोलनं देखील झाली. सध्या याच घटनेवरून थोरात आणि विखे-पाटील कुटुंबीयांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'संगमनेर तालुका तुमच्या बापाची इस्टेट नाही. तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका.' अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, 'सुजय विखेंच्या सभेत जे वक्तव्य झालं त्याबद्दल आम्ही स्पष्टीकरण दिलंय. वसंतराव देशमुखांनी जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध केलाय. माझ्या आणि सुजयच्या सार्वजनिक जीवनात आम्ही कधीही अशी वक्तव्य केली नाही. देशमुख यांना अटक करावी हीच मागणी आम्ही केली होती. मात्र वसंत देशमुख हे भाजपचे नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी. '

तसंच,'देशमुख बोलले यामागे राजकीय षडयंत्राचा भाग वाटतोय. अर्ध्यातासांत थोरातांचे गुंड गोळा झाले. थोरातांचा पीए, त्यांचे भाऊ इंद्रजीत थोरात यांच्या गाडीत काठ्या-कुऱ्हाडी होत्या. त्यांना सुजयवरच प्राणघातक हल्ला करायचा होता. संगमनेर तालुक्यात सुजयची लोकप्रियता वाढली. त्यांच्या बालेकिल्ल्यात सुजयच्या उच्चांकी सभा होताय. म्हणून थोरातांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या वर्षे त्यांनी दहशत माजवून निवडणुका जिंकल्या. एकीकडे स्वतःला सुसंस्कृत म्हणता आणि दुसरीकडे राजकीय दहशतवाद सुरू ठेवता. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुनियोजित होती. महिला आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाली. याची चौकशी व्हायलाच पाहिजे. याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध घ्यावा लागेल.', असे विखे-पाटील यांनी सांगितले.

वसंत देशमुखांच्या वक्तव्याबद्दल बोलताना विखे-पाटील यांनी सांगितले की, 'आम्ही देशमुखांच्या वक्तव्याने समर्थन केलेच नाही वसंतराव देशमुख यांना अटक झाली. त्याला आम्ही लपवला हा आरोप चुकीचा. तुमच्या लोकांनी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. विखेंना गावबंदी आणि तालुका बंदी करण्याची भाषा करतायत. तुमच्या बापाची इस्टेट आहे का? तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका. जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.'

जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलताना विखे-पाटील यांनी सांगितले की, 'जयश्री ताईबद्दल आम्ही काहीच बोललो नाही. त्या स्वतःला या प्रकरणात का ओढाऊन घेताय? तुम्ही या भानगडीत येऊ नका. तुमच्या पिताश्रींचा दहशतवाद समोर आलाय. वसंत देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते म्हणजे ते आमचे होत नाहीत. जयश्रीताई फार छोट्या आहेत. त्यांना अजून फार शिकायचं आहे. सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता. त्याची माफी कोण मागणार?', असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक होणार? शोक सभेदरम्यान बड्या नेत्याने तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT