आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची आणि फोन उचलत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबबत माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांच्या कोणत्याच ओएसडी आणि स्विय सहायकांनी फोन घेतले नसल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विखे पाटील हे 'ऑनलाईन पालकमंत्री' असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नाहीत. उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील प्रश्न, पूर स्थितीवर चर्चा करण्यासाठी मिटकरी यांनी विखे पाटील यांना फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही त्यामुळे ते संतप्त झाले आहेत.
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांवी राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो शेअर करत लिहिले की, 'राधाकृष्ण विखे पाटीलसाहेब आपण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नाबाबत २ दिवसांपासून आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपला कॉल लागत नाही. शिवाय आपले OSD पडवळ, चव्हाण, पवार, माने यांचाही प्रतिसाद येत नाही. आमदार म्हणून खंत व्यक्त करतोय.', असे म्हणत अमोल मिटकरी यांनी विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला.
तसंच, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे या मंत्र्यांसंदर्भात असाच अनुभव आल्याची देखील तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांची तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोल्यात भाजपचे आमदार रणधीर सावरकरांना पालकमंत्री करा, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.