Maharashtra Politics: मविआला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार? विधानसभेत 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास

Maharashtra Congress News: लोकसभा निवडणूकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने 288 जागांवर सर्व्हे केलाय. या सर्व्हेचा नेमका काय अंदाज आहे? महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार?
मविआला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार? विधानसभेत 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास
Congress CM In MaharashtraSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसने विधानसभेसाठी 288 जागांचा सर्व्हे केलाय. या पहिल्याच सर्व्हेत काँग्रेस 75 जागांवर विजयी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर या सर्व्हेत काँग्रेसला अच्छे दिन येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय.

मविआला बहुमत, काँग्रेसचा मुख्यमंत्री?

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यातील 288 मतदारसंघात सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेत विधानसभेला काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार असल्याचं दिसतंय. काँग्रेसचे 75 आमदार निवडून येणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या सर्व्हेत कोणता उमेदवार निवडून येणार? याचा अभ्यास केला जाणार आहे.

मविआला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार? विधानसभेत 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास
Manoj Jarange: जरांगेंचा डाव, कुणावर घाव? विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे अर्ज मागवणार; सत्ता मिळवण्याची आखली रणनीती?

काँग्रेसने जागांची चाचपणी केली असली तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. मात्र आता पहिल्या सर्व्हेनंतर आम्ही उमेदवार निश्चित करण्यासाठी दुसऱा सर्व्हे करणार असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.

मविआला बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार? विधानसभेत 75 जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास
Maharashtra Politics: 'जरांगेंविरोधात अभियान सुरु करणार', लाडकी बहीण योजेनवर टीका केल्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक

लोकसभेत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय. मात्र विधानसभेत मविआतल्या जागावाटपात काँग्रेसला हव्या त्या जागा मिळवण्यात यश आलं आणि ऐन निवडणुकीच्या काळात एकमेकांना अडचणीत आणणा-या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकदिलानं काम केलं तरच काँग्रेसला यशाची पुनरावृत्ती करता येईल...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com