Maharashtra Politics: अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? आशिष शेलार यांनी केलं मोठं वक्तव्य; VIDEO

Ashish Shelar On Amit Thackeray: विधानसभा निवडणुकीत महायुती अमित ठाकरे यांना देऊ शकते पाठिंबा? आशिष शेलार यांनी केलं मोठं वक्तव्य...
अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? आशिष शेलार यांनी केलं मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
Raj Thackeray and Amit ThackeraySaam Tv
Published On

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेने माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला आपला पाठिंबा दर्शवला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही विधानसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यातच आता महायुतीकडून अमित ठाकरे यांना पाठींबा देण्यात येणार का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचेच उत्तर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलं आहे.

अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? आशिष शेलार यांनी केलं मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
Amit Thackeray Exclusive : विषय संपला! दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाहीत; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

काय म्हणाले आशिष शेलार?

अमित ठाकरे यांना महायुतीच्या पाठिंब्याबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ''मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांना विनंती करणार आहे. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद नाही. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोधही नाही. पण का असं होऊ शकत नाही, हे महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊन, जर आपल्याच घरातले राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल, तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ.''

शेलार म्हणले की, ''उद्धव ठाकरे यांना नात्याबद्दल काही वाटत नसेल, मात्र महायुती, या नात्याने आमच्या घरातील पहिलीच निवडणूक लढवणारा अमित ठाकरे असेल, तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे.''

अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? आशिष शेलार यांनी केलं मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
Sujay Vikhe-Patil: मला जीवे मारण्याचा कट होता, सुजय विखेंचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांच्यावर टीका करत आशिष शेलार पुढे म्हणाले की, ''असं वाटतं की, आपण सगळ्यांनी सर्वच पक्ष प्रचार आक्रमक जरूर करावा. एकमेकांवर टीका जरूर करावी, मात्र मर्यादा पाळून करावी. आता या सगळ्या मर्यादा पार करून वेगवेगळ्या माणूस आहे, ते विश्वविख्यात प्रवक्ता संजय राऊत त्यांना तुम्ही जर दाखवणं बंद करावं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com