Bachchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: '१९ फेब्रुवारीपर्यंत काहीही बोलणार नाही...' आरक्षणाच्या मुद्यावरुन बच्चू कडू यांची सावध भूमिका

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २९ जानेवारी २०२४

Bacchu Kadu News:

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या आरक्षणाविरोधात ओबीसी नेते आक्रमक होत आहेत तर सरकारमधील मराठा नेते या निर्णयाचे स्वागत करताना दिसत आहेत. अशातच आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणाबाबत १९ फेब्रुवारीपर्यंत काहीच बोलणार नाही, असे म्हणत सावध भूमिका घेतली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

श्रीरामपुर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचे आ.बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या दुचाकीवर प्रवास करत आ.बच्चू कडू यांच्यासह प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. यादरम्यान बोलताना बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात घेतलेल्या भूमिकेवरुन महत्वाचे विधान केले. १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षणावरुन काहीही बोलणार नाही, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली.

तसेच "दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले. मात्र खालच्या स्तरावर नियुक्ती झालेल्या नाहीत. जिल्हास्तरावर आम्हाला अधिकारी द्या असा दिव्यांग मंत्रालयाला प्रस्ताव दिलाय, असे म्हणत दिव्यांग भवन तालुक्याच्या ठिकाणी होतोय याचा आनंद असल्याचेही" बच्चू कडू (Bacchu Kadu) यावेळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळ आक्रमक...

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. ओबीसींच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल, असं भुजबळांनी ठामपणे सांगितलं आहे. गरज पडली तर सरकारमधून बाहेर पडेन, पण मी माझी भूमिका बदलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT