Pandharpur: पंढरपूरकरांवर ओढावलं जलसंकट; संपूर्ण शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा

Pandharpur Water Supply News: धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आतापासूनच एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.
Pandharpur
PandharpurSaam TV
Published On

Water Supply News:

तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरी नगरीवर उन्हाळ्यापूर्वीच जल संकट ओढावले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्याने आजपासून (२९ जानेवारी) शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Pandharpur
Coconut Water: नारळ पाणी प्यायल्याने पुरुषांना होतील 'हे' फायदे

वाढती पाणी टंचाई लक्षात घेवून नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. उजनी धरणातील पाणी पातळी मायन्स गेली आहे. त्यामुळे धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आतापासूनच एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.

सध्या येथील बंधाऱ्यात आणखी दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विक्रम शिसरसट यांनी केले आहे.

यंदा राज्यात अनेक ठिकाणी हवातसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. काही ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसांतही विहिरी कोरड्या पडल्यात.

पाणीपुरवठा योजनेसाठी खोदले रस्ते, काम संथ गतीने होत असल्याने गावकरी त्रस्त

वाशीमच्या मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा इथं जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीनं होत असून, गावात पाईप लाईन करण्यासाठी मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदून खड्डे करण्यात आले आहेत. काम पूर्ण होत नसल्याने पाण्यासह नागरिकांना खराब रस्त्यांचा देखील सामना करावा लागतोय.

Pandharpur
Thane Crime News: जीवाभावाचा मित्रच बनला शत्रू! लाकडाच्या प्रहाराने मित्रालाच संपवलं, ठाण्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com