Thane Crime News: जीवाभावाचा मित्रच बनला शत्रू! लाकडाच्या प्रहाराने मित्रालाच संपवलं, ठाण्यातील खळबळजनक घटना

Youth killed In Thane: ठाण्यातील समता नगर परिसरात २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरूणाच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
Youth killed In Thane
Youth killed In ThaneSaam Killed
Published On

Thane Crime Youth killed

ठाण्यात दिवसेंदिवस खून, बलात्कार, गुन्हेगारी हे प्रकरणं वाढत आहेत. आता ठाण्यातील समता नगर परिसरात पाइपलाइन मार्गावर २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊ या. (latest crime news)

ठाण्यातील समता नगर या ठिकाणी हत्या झालेल्या या युवकाचं नाव तानाजी शिंदे असं (Thane Crime News) आहे. समता नगर येथील पाईप लाईन परिसरात सदरचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार सकाळी समोर आला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस पुढील तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मित्रानेच केला खून

ठाण्यातील या हत्येप्रकरणी त्याच्या एका मित्राला वागळे इस्टेट पोलिसांनी ताब्यात घेतलं (Thane Crime) आहे. वागळे पोलीस ठाण्याच्या नियंत्रणाला समता नगरच्या पाइपलाइन परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचा फोन आला होता. वागळे पोलीस स्टेशन आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

या तपासादरम्यान आम्हाला कळले की, पहाटे पाच वाजता तानाजी शिंदे (वय 28) याच्या मित्रांनी घरातील चौकटीच्या लाकडाने प्रहार करून त्याची हत्या (Youth killed In Thane) केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळाची संपूर्ण तपासणी करत आहेत. घटनास्थळी असलेले पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

Youth killed In Thane
UP Crime News: धक्कादायक! पती-पत्नीसह तीन मुलांचा होरपळून मृत्यू , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

हत्येप्रकरणी चौकशी सुरु

वागळे पोलीस स्टेशनने तपास सुरु केला आहे. दरम्यान काल रात्री मयत तानाजी शिंदे सोबत कोण होतं? याचाही तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मयत तानाजी शिंदे यांच्या एका मित्राला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु केली आहे. या हत्येप्रकरणी इतर मित्रांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत.

या घटनेमुळं परिसरात चांगलीच खळबळ उडाली (Crime News) आहे. घटनेतून मित्रच त्याचा वैरी बनल्याचं पाहायला मिळतंय. परंतु अजून तानाजी शिंदेचा खून का झाला, याचं कारण मात्र अस्पष्ट आहे.

Youth killed In Thane
Gangster Sharad Mohol Killed: पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या, कोण होता शरद मोहोळ? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com